कळंब :डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब व आयक्युएसी/रासेयो विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'युवकांचा ध्यास ग्राम विकास' विशेष वार्षिक शिबीराचे दि.१२/०१/२०२३ ते १८/०१/२०२३ या कालावधीत जि.प.शाळा मौ.जवळा ता.कळंब जि.उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आले आहे.या शिबीराचे उदघाटन गुरुवार दि.१२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ठिक ११.१५ वा. मोठ्या उत्साहाने सम्पन्न झाले.यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊंच्या व स्वामी विवेकानंदांच्या जयंती निमित्त प्रथमतः त्यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.यावेळी मान्यवरांचे महाविद्यालयाच्या वतीने शाल,पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.प्रमुख मान्यवरांमध्ये मा. श्री.अण्णासाहेब पवार (चेअरमन, ग्रा.वि.वि.सो. जवळा खु.)श्री.दंडेवार ( मुख्याध्यापक,जि.प. प्रा.शाळा जवळा खु),व प्रमुख मार्गदर्शक मा. हनुमंतजी झांबरे (ग्रामविकास अधिकारी)प्राचार्य. शशिकांत जाधवर, कार्यक्रमाधिकारी प्रा. ज्योतिराम जाधव प्रा. मनिषा कळसकर, एनएसएस विद्यार्थी प्रतिनिधी कु.वैष्णवी कळढोण हे उपस्थित होत.यावेळी प्रमुख मार्गदर्शक श्री.हनुमंत झांबरे साहेब यानी राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्देश व रा.से.यो चे स्वयंसेवक यांच्या कार्या विषयी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी रासेयो विद्यार्थी प्रतिनिधी कु.वैष्णवी कलढोण तसेच स्वयंसेविका कु.राणी मुळीक, कु.सानिका गायकवाड,कु.वर्षा ओमन,कु.क्षितिजा गायकवाड यानी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.शिवाजी (आप्पा) कापसे (सचिव शि.से.प. चॅ.ट्रस्ट कळंब) होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ज्योतिराम जाधव व अध्यक्षीय समारोप प्राचार्य.शाशिकांत जाधवर यानी केले. सुत्रसंचालन प्रा. सौ.मनिषा कळसकर यानी केले आभार प्रा.अनिल जगताप यानी मानले. यावेळी कॉलजचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यकम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
१२ जानेवारी, २०२३
Home
Unlabelled
छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या रा.से.यो विशेष शिबीराचे उद्घाटन
छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या रा.से.यो विशेष शिबीराचे उद्घाटन
About Kalayog
कलायोग हे वृत्तपत्र कला, साहित्य,आरोग्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील ठळक घडामोडींचा वेध घेऊन वाचकांना वास्तविकतेचे निष्पक्ष दर्शन घडवते.मुख्य संपादक - शरद बलभीम आडसुळ Call - 9689895852.