छत्रपती शिवाजी महाविद्यालयात 'विश्व हिंदी दिन' साजरा - kalayog

११ जानेवारी, २०२३

छत्रपती शिवाजी महाविद्यालयात 'विश्व हिंदी दिन' साजरा


कळंब :डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित छत्रपती शिवाजी महाविद्यालय , कळंब व आयक्युएसी / हिंदी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात मंगळवार दि.10/01/2023 रोजी 'विश्व हिंदी दिन ' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे वक्ते हिंदी विभाग प्रमुख प्रा.ज्योतीराम जाधव यांनी आपल्या व्याख्यानात हिंदी भाषेचा विकास,जनसंपर्क भाषा हिंदी,आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदी भाषेचा विकास या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
    कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य,शशिकांत जाधवर सर होते. कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत समन्वयक प्रा.शफीक चौधरी प्रा.नामदेव तोडकर होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समोरोप प्रा.शशिकांत जाधवर यानी केले.प्रास्ताविक प्रा.चौधरी व सुत्रसंचालन प्रा.तोडकर यानी केले. आभार डॉ.हनुमंत माने यानी मानले. यावेळी महाविद्यालयातील  शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी  उपस्थित होते. 
 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.