वावर हाय तर पावर हाय , शेतकरी अभ्यास सहल संपन्न - kalayog

९ जानेवारी, २०२३

वावर हाय तर पावर हाय , शेतकरी अभ्यास सहल संपन्न

उस्मानाबाद मधील कृषी विभागाच्या भूम उपविभागामार्फत दि. 03/01/2022 ते 07/01/2023 एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम अंतर्गत प्रक्षेत्र प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. यामध्ये भूम उपविभागातील भूम, परांडा, वाशी, कळंब या चार तालुक्यातील एकूण 60 शेतकऱ्यांनी फलोत्पादन तथा प्रक्रिया विषयात मार्गदर्शन मिळावे यासाठी विविध ठिकाणी भेटी दिल्या.  दिनांक 03/01/2023 रोजी शेतकरी व अधिकारी/कर्मचारी यांच्या चमू ने सिल्लोड येथे आयोजित कृषी महोत्सवास भेट दिली. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी दि. 04/01/2023 रोजी शेतकऱ्यांनी  वारेगाव, ता. फुलंब्री येथे शून्य मशागत तंत्रज्ञानाविषयी माहिती घेतली, तसेच नेवासा फाटा येथील श्रीनिकेत भगत आणि योगेश शेजुळ यांनी शेतकऱ्यांना आधुनिक डाळिंब उत्पादन तंत्रज्ञान विषयी मार्गदर्शन केले. तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी निफाड येथील ओम गायत्री आधुनिक रोपवाटिकेस भेट देऊन तुती संवर्धनाद्वारे द्राक्ष रोपे तयार करणे आणि कांदा उत्पादन तंत्रज्ञान समजून घेतले.त्याच बरोबर सह्याद्री फार्म येथे भेट देऊन त्यांची स्थापना, सुरुवातीचे काम, कार्यपद्धती इत्यादींविषयक माहिती घेतली. दि. 05/01/2023 रोजी लोणारवाडी ता. सिन्नर येथील देवनदी वॅली शेतकरी उत्पादक कंपनी येथे भेट देण्यात आली.  यादिवशी कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर येथे स्पिरुलिना उत्पादन तंत्रज्ञान विषयक माहिती घेतली.
त्याच बरोबर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे काढणीपश्चात तंत्रज्ञानामध्ये फळपिकांवरील प्रक्रिया केंद्रास भेट दिली. 
कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी शेतकऱ्यांनी कांदर, सापटने  येथील प्रगतिशील शेतकऱ्यांकडून केळी उत्पादन तसेच पणन तंत्रज्ञान, आंब्याचे बहर नियोजन याविषयक माहिती घेतली आणि विठ्ठलगंगा शेतकरी उत्पादक कंपनी गुळ प्रकल्पास भेट दिली. प्रक्षेत्र प्रशिक्षण दौरा सहल पूर्ण करून प्रशिक्षणाची सांगता करताना भूम येथील उपविभागीय कृषी अधिकारी माननीय श्री शुक्राचार्य भोसले  तसेच उपविभागीय कृषी विभागाचे तंत्र अधिकारी उडुप , परंडा येथून कृषी सहाय्यक जाधव आर बी वाशी येथील कृषी सायक जाधव कळंब येथील मंडळ कृषी अधिकारी हुरगट यांच्या सह सर्व शेतकऱ्यांचे उजळणी कार्यक्रम घेऊन कार्यक्रमाची सांगता केली व परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रशिक्षणार्थी व कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचा तसेच सहलीचा ड्रायव्हर सर्व शेतकऱ्यांनी मिळून हार गुच्छ व फेटा बांधून सत्कार केला अशा खेळीमेळीच्या वातावरणात वाढदिवसाचा सहलीचा प्रक्षेत्रभेट कार्यक्रम आनंदात पार पाडला याचसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा अशा ओवी प्रमाणे आज शेवटचा सहलीचा प्रक्षेत्र भेट कार्यक्रम सुखरूप पार पडला.  या वेळी युवा शेतकरी मोठ्या प्रमाणावर यात सहभागी झाले होते.