कळंब - व्यसनाच्या आहारी न जाता विद्यार्थ्यांनी नियमित व्यायाम करून आपले आरोग्य सुदृढ ठेवावे असे प्रतिपादन उपक्रमशील क्रीडा शिक्षक लक्ष्मण मोहिते यांनी केले.
डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब शहरातील वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्ताने अभिवादन व प्रजासत्ताक दिनानिमित्ताने क्रीडास्पर्धेचे उदघाटन संपन्न झाले.
या प्रसंगी उपक्रमशील क्रीडाशिक्षक लक्ष्मण मोहिते हे प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कॉलेज मधील विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट,खो-खो,कबड्डी,भालाफेक,गोळा फेक,बॅडमिंटन स्पर्धा व सांस्कृतिक विभागातर्फे वक्तृत्व व निबंध स्पर्धा पार पडल्या जाणार आहेत.
याप्रसंगी प्राचार्य सुरज भांडे,प्रा. श्रीकांत पवार,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके,
क्रीडाशिक्षिका प्रा.मोहिनी चोंदे-शिंदे,क्रीडाशिक्षक अविनाश म्हेत्रे,निदेशक विनोद जाधव,निदेशक सागर पालके,विनोद कसबे आदींची उपस्थिती होती.