भोगजी-
13 एप्रिल 2022 वार- बुधवार रोजी कळंब तालुक्यातील भोगजी शाळेत पुढील वर्षी पहिलीत दाखल होणाऱ्या बालकांसाठी शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन केले होते.सदर मेळाव्याची सुरूवात आकर्षक अशा प्रभातफेरीने करण्यात आली. प्रभातफेरीनंतर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री भारत आडसूळ,उपाध्यक्ष श्री समाधान खराटे, उपस्थित पालक यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले .सदरील मेळाव्यामध्ये विद्यार्थी नोंदणी कक्ष, शारिरीक विकास, बौद्धिक विकास,सामाजिक व भावनात्मक विकास , भाषा विकास, गणनपूर्व तयारी, माता- पालकांना मार्गदर्शनव साहित्य वाटप असे विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते त्यामध्ये मुलांना पहिलीत प्रवेश घेण्यापूर्वी कोणकोणती कौशल्ये ,क्षमता अवगत आहेत याची पडताळणी करण्यात आली. शेवटी माता पालकांना विद्यार्थ्यांसंबंधी आवश्यक असे मार्गदर्शन करून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना जिलेबी गोड पदार्थ वाटप करण्यात आला
पुढील वर्षी पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांना घरी जशी ही माझी आई तशी ही माझी शाळा असे वाटत होते शाळेविषयी भिती नव्हे तर आवड वाटत होती पहिल्यांदाच शाळेत येऊन सुद्धा मुले आनंदित होती सदर उपक्रमाचे गावकऱ्यांकडून कौतूक करण्यात आले या मेळाव्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री बालासाहेब चौधरी, धनंजय गव्हाणे, विश्वास भोसले, बाबासाहेब उबाळे, बिभीषण मुंडे,यांनी परिश्रम घेतले