भोगजीत पद्मावती देवी च्या प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन कार्यक्रमाचे आयोजन - kalayog

२८ मार्च, २०२२

भोगजीत पद्मावती देवी च्या प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन कार्यक्रमाचे आयोजन

 

भोगजी तालुका कळंब येथे ग्रामदैवत पद्मावती देवी च्या प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पद्मावती देवी हे जागृत देवस्थान म्हणून पंचक्रोशीत भाविक भक्तांची श्रद्धा आहे. आज पर्यंत देवीला मंदिर नव्हते याचे कारण असे सांगण्यात येते की मंदिराच्या बांधकामासाठी काशी वरून पाणी आणले तरच मंदिर बांधले जाईल व त्यानुसारच काशी वरून पाणी आणून दोन वर्षापूर्वी मंदिराचे बांधकाम विधिवत पद्धतीने सुरू झाले व आज दिनांक 28 मार्च 2022 शालिवाहन शके 1943 फाल्गुन कृष्ण 11 या मुहूर्तावर पद्मावती देवीच्या प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण करण्यात येत आहे यासाठी सर्व ग्रामस्थांच्या सहभागातून व भाविक भक्तांच्या सहकार्याने या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आहे. वैशाख पौर्णिमेनंतर येणारा शुक्रवार किंवा मंगळवार या दिवशी देवीची मोठी यात्रा भरते त्यादिवशी दुरून भाविक भक्त दर्शनासाठी येतात देवीच्या दोन मानाच्या पालकांची मिरवणूक होऊन देवीला शुद्ध पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो त्याच बरोबर दैत्यास प्राण्यांचा बळी देण्याचीही प्रथा या ठिकाणी आहे. भोगी गावात देवीचं वास्तव्य असल्यामुळे भोगजी गावावर कसले संकट देवी येऊ देत नाही अशी लोकांची श्रद्धा आहे याचेच उदाहरण म्हणजे जागतिक महामारी कोरोना सगळीकडे हाहाकार माजलेला असतानादेखील भोगजी गावावर या संकटाचा परिणाम झाला नाही हा देवीने ची या गावाचे रक्षण केले अशी लोकांची ठाम श्रद्धा आहे. त्याच बरोबर भोगजी शिवारात काशी आई च्या मंदिराचे देखील बांधकाम करण्यात आले असून येथे देवीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण याचा कार्यक्रम देखील याच दिवशी आयोजित करण्यात आला आहे काशी आई हे ठिकाण स्थानिकांच्या सांगण्यावरून पूर्वी भोगी गावाच्या शेजारून जाणाऱ्या नदीत भोगजी पासून पश्चिमेला एक ते दीड किलोमीटर अंतरावर मोठमोठे आवाज होऊन त्या ठिकाणावरुन पांढऱ्या पाण्याचे झरे निघाल्याचे सांगण्यात येते देवीला अपेक्षित असलेल्या शुचिर्भूत तेचा कोण्या एका व्यक्तीकडून भंग झाल्यामुळे तेथील शुद्धतेसाठी देवीने स्वतः काशी तीर्थ प्रकट करून शुचिर्भूतता केली अशी आख्यायिका आहे व त्यानंतर या ठिकाणी लोक येऊन देवीची पूजा करू लागले व येथे मोठ्या प्रमाणावर यात्रा भरू लागली