दोन अडीच वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर कालपासून शाळांमध्ये पहिलीपासून विद्यार्थी येण्यास सुरुवात झाली. विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाची सुरुवात इयत्ता पहिली पासून होते परंतु जागतिक महामारी कोरोना यामुळे पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतल्यापासून शाळेत न जाता आलेली मुले आज सरळ तिसरीच्या वर्गात प्रवेश करताना पुरती गोंधळलेली दिसली गुरुजी शाळेत आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे हसत मुखाने(मास्क लावल्यामुळे हसत मुख दिसत नव्हते एवढेच) स्वागत करून त्याला त्याच्या वर्गात बसण्यासाठी मदत करत होते. असे म्हणतात शाळा एक बाग आहे शिक्षक हा माळी आहे व मुले ही त्यात बहरणारी फुले आहेत हीच फुले पाहण्यासाठी आतुरलेले डोळे आज तृप्त होऊन पाणावलेले दिसले आज वर आलेली वेळ यानंतर कधीही येऊ नये अशी आशा व्यक्त करून गुरुजनांनी प्रत्यक्षात आपल्या कार्याला सुरुवात केली परंतु समोर ठेवलेल्या आव्हानाचं ओझ पेलताना गुरुजनांची दमछाक होताना दिसून येत आहे.
८ फेब्रुवारी, २०२२
Home
Unlabelled
फुलोरा बहरू लागला
फुलोरा बहरू लागला
About Kalayog
कलायोग हे वृत्तपत्र कला, साहित्य,आरोग्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील ठळक घडामोडींचा वेध घेऊन वाचकांना वास्तविकतेचे निष्पक्ष दर्शन घडवते.मुख्य संपादक - शरद बलभीम आडसुळ Call - 9689895852.