"मराठी भाषेमध्ये अर्थार्जनाच्या संधीच संधी" डॉ.विजया पवार - kalayog

२७ जानेवारी, २०२२

"मराठी भाषेमध्ये अर्थार्जनाच्या संधीच संधी" डॉ.विजया पवार


कळंब :येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयांमध्ये 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' निमित्त IQAC  आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन  दिनांक २७/०१/२०२२ रोजी करण्यात आले होते. 'मराठी भाषा आणि अर्थार्जनाच्या संधी'या विषयावर आपले मत व्यक्त करत असताना डॉ. विजया पवार यांनी उपरोक्त मत मांडले. महाराष्ट्र शासन, शिक्षण  संचालनालय ,उच्च शिक्षण यांच्या आदेशाप्रमाणे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनांक १४ ते २८ जानेवारी 2022 या कालावधीमध्ये साजरा करण्याचे सूचित केले होते .त्या आदेशानुसार महाविद्यालयांमध्ये डॉ.विजया पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मा. शिवाजी (आप्पा)कापसे ,सचिव, शिवसेवा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, कळंब हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये मा. श्री.श्याम (नाना )खबाले, अध्यक्ष,शिवसेवा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट ,कळंब हे होते .या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मा.प्रा.अविनाश मोरे सर, उपाध्यक्ष,शिवसेवा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, कळंब हे होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा.डॉ.हनुमंत माने यांनी केले .तर पाहुण्यांचा परिचय डॉ.विद्युलता पवार मॅडम यांनी करून दिला .या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य शशिकांत जाधवर यांनी केला .तर आभार प्रा. शफिक चौधरी यांनी मानले हा  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तांत्रिक सहाय्य प्रा. शिवाजी पावले सर ,प्रा.विनायक मिटकरी सर, IQAC चे समन्वयक प्रा.अनिल जगताप तसेच श्री. दत्तात्रय कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले एकंदरीत हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील प्रा. तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील तसेच राज्यातील इतर महाविद्यालयातीलअनेक प्राध्यापक आणि विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित होते.अनेक विद्यार्थ्यांना मराठी भाषा रोजगाराच्या संधी कशी उपलब्ध करून देऊ शकते .या संदर्भात हे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे वाटते. अशी विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये चर्चा होत आहे.