इटकूर प्रशालेत पत्रकार व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार - kalayog

६ जानेवारी, २०२२

इटकूर प्रशालेत पत्रकार व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

यशस्वी जीवनासाठी स्पर्धा परीक्षा एकमेव मार्ग - स. पो. नि. लांडगे

प्रतिनिधी
ईटकूर-  यशस्वी जीवन जगण्यासाठी ग्रामीण मुलांना स्पर्धा परीक्षा हाच एकमेव मार्ग आहे असे प्रतिपादन नांदेड येथील सहा. पो. नि. महेश लांडगे यांनी जि. प. प्रशाला इटकूर येथे 6 जानेवारी रोजी आयोजित पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा सन्मान व नवोदय-शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. 
या सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिदास पावले तर प्रमुख अतिथी म्हणून नांदेड येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक  महेश लांडगे , श्रीकांत सावंत, प्रभाकर आडसुळ, मुख्याध्यापक ठोंबरे उपस्थित होते. यावेळी प्रशाला च्या वतीने पत्रकार दिनानिमित्त एकमतचे  अनंत  आडसूळ, बालाजी देसाई, श्रीकृष्ण कुंभार, अमोल रणदिवे, सुधाकर रणदिवे, शरद आडसूळ यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. तसेच प्रशालेतील नवोदय-शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये शर्वरी गंभीरे, वैष्णवी आडसूळ, नारायण पारखे, प्रीती गाडे, प्रांजली आडसूळ, वंदिता कोठावळे, भारती आडसूळ, सुप्रिया जाधव, संदेश आडसूळ, राधिका गंभीरे, सिद्धी कानडे, सिद्धी आडसूळ, आर्या गाडे या विद्यार्थ्यां ना भरघोस बक्षिसे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले . यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक अनिल शिरसागर ,अंजली यादव व विजय देसाई यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला . यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना  निरीक्षक लांडगे म्हणाले की, शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षांची कास धरली तर भावी आयुष्य यशस्वीपणे जगता येऊ शकतं व कोणत्याही क्षेत्रात यश मिळू शकतं, ही प्रेरणा विद्यार्थ्यांना  दिली. तसेच पत्रकार आनंद अडसूळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की ,पत्रकारिता हा समाजाचा आरसा असून विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच वाचनाची आवड जोपासली जावी त्याशिवाय प्रभावी लेखन करता येणार नाही असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. अंजली यादव यांनी केले तर प्रास्ताविक अनिल क्षिरसागर यांनी केले. आभार सहशिक्षक चंद्रकांत शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमास शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.