कळंब येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये IQAC आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ आॅक्टोबर २०२१ रोजी 'मराठी साहित्यातील 'स्त्री' चित्रण'या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय आॅनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले होते.या चर्चासत्रासाठी अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव मा.शिवाजी (आप्पा) कापसे हे होते.उद्घाटक म्हणून मा.प्रा.डाॅ.एम.बी.धोंडगे(सिनेट सदस्य,डाॅ.बा.आं.म.वि.औरंगाबाद) तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डाॅ.राजकुमार यल्लावाड (सदस्य,मराठी अभ्यास मंडळ,डाॅ.बा.आं.म.वि.औरंगाबाद.) हे ऑनलाईन उपस्थित होते.चर्चासत्रासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख प्रा.डाॅ.वंदना महाजन ह्या होत्या.या चर्चासत्रामध्ये मार्गदर्शन करताना त्यांनी वरील उद्गगार काढले.मराठी साहित्यातील स्त्री चित्रणाचा अभ्यासपूर्ण लेखाजोखा त्यांनी मांडला.मराठी साहित्यामध्ये आजपर्यंत आलेले स्त्री चित्रण विचारत घेतले असता त्यामध्ये मानव मुक्तीचा परिप्रेक्ष्य लक्षात घेऊन लेखन केलेले दिसत नाही
ही खंत त्यांनी व्यक्त केली.यावेळी मार्गदर्शन करताना प्रा.डॉ.एम.बी.धोंडगे यांनी प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी साहित्यातून आलेल्या स्त्री चित्रणाचा अभ्यासपूर्ण वेध घेतला, तसेच प्रमुख अतिथी प्रा.डाॅ.राजकुमार यल्लावाड यांनी याविषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे मुख्य आयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य शशिकांत जाधवर हे होते . अध्यक्षीय समारोप प्राचार्य शशिकांत जाधवर यांनी
केला.यावेळी त्यांनी मार्गदर्शकांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाचे कौतुक केले.या चर्चासत्राचे संयोजक म्हणून प्रा. डॉ. हनुमंत माने आणि प्रा.अनिल जगताप यांनी कार्य केले.हे चर्चासत्र यशस्वी होण्यासाठी प्रा. डॉ. प्रदिप इंगळे,प्रा. अरविंद शिंदे, विक्रांत मिटकरी,प्रा.शफिक चौधरी , डॉ.पवार मॅडम,प्रा.डाॅ.विजय पडवळ ,प्रा.चोरघडे, प्रा.विजय घोळवे,प्रा.सोमनाथ कसबे,प्रा.विनायक मिटकरी,प्रा.अमोल शिंगटे,प्रा.डाॅ. महेश पवार. तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी श्री.किशोर फावडे,श्री.जयसिंग चौधरी,श्री. सुनिल लाटे , श्री. दत्तात्रय गायकवाड, श्री.मूर्लीधर
चोंदे,श्री.सुंदर कदम आणि श्री. दत्तात्रय कांबळे तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापक, विद्यार्थी आणि रसिक श्रोते यांचेही अप्रत्यक्षरीत्या सहकार्य लाभले.