कळंब: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब राष्ट्रीय सेवा योजना विभाग व मिशन युवा स्वास्थ्य कोविड-19 अंतर्गत उप-जिला रुग्णालय कळंब.यांच्या माध्यमातून महाविद्यालयात दिनांक 27/10/2021 रोजी ' कोविड १९' लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. लसीकरण मोहिमे चे उद्घाटन उप -जिल्हा रुग्णालय कळंब येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. जीवनराव वायदंडे साहेब यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यानी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लस घेण्याचे आव्हान केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य.शशिकांत जाधवर,रासेयो विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. अनिल जगताप,डॉ.पडवळ, डॉ. नरवडे,प्रा.घाडगे,प्रा. शिंदे,प्रा. चोरघडे,प्रा. शिंगटे,प्रा.गंभिरे,प्रा. पवार,काका चोंदे, गायकवाड,कांबळे विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपास्थित होते. या लसीकरण शिबीरात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे लसीकारण करण्यात आले. यावेळी उप-जिल्हा रुग्णालय कळंब येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. जीवनराव वायदंडे साहेब व त्यांचे सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य शशिकांत जाधवर, रासेयो विभाग प्रमुख प्रा. अनिल जगताप,रासेयो विभागातील स्वयंसेवक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यानी पुढाकार घेतला.