कळंब:- नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य स्तरीय चतुर्थचरण व हिरकपंख या परीक्षेस समर्थ प्राथ.शाळा कळंब चा कब-बुलबुल पथकाचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. ही परीक्षा आँनलाईन घेण्यात आली. त्यामध्ये लेखी, तोंडी, व प्रात्यक्षिक अशा तिन्ही प्रकारात घेण्यात आली. शिबीरप्रमुख म्हणून श्री. जनार्दन इरलेसर(बीड) व श्रीमती शिवकांता तांडेमँडम (नांदेड) यांनी काम पाहिले.
ही इयत्ता तिसरीत शिकणा-या मुलांसाठी परिक्षा असते.या परीक्षेत उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना राज्यपालांच्या कडून प्रमाणपत्र मिळते व हे विद्यार्थी राष्ट्रपती पुरस्कार परीक्षेस बसण्यास पात्र ठरतात. कमी वयात राज्य व राष्ट्रपती पुरस्कार मिळवून देणारी ही एकमेव पात्र परिक्षा आहे.
या पुरस्कार चाचणीसाठी समर्थ प्रा.शाळा कळंब मधील कब पथकातीलवेदांत राजाराम तोडकर , श्रेयश शक्तिकुमार भवर, राजवीर चेतन भवर, अंश नितीन भवर ,प्रियांशू प्रशांत भवर, इनायत अली सादिक अली सय्यद ,ऋषिकेश सोमनाथ कवडे ,समर्थ सुमंत उगलमुगले व बुलबुल पथकातीलजानवी गुणवंत पवार, शुभ्रा सुनील वाघमोडे, आलिया अन्वर आतार , आरती महेश थोरात ,श्रावणी रवी साळुंके
या चिमुकल्यांनी आपला सहभाग नोंदवला.या सर्वांना कब मास्टर अण्णासाहेब वाघमोडे व बुलबुल कँप्टन श्रीमती वनिता साचणे मँडम,स्काऊट-गाईड कँप्टन श्रीमती प्रतिभा रामचंद्र गांगर्डे यांनी मार्गदर्शन केले.
सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या मु.अ.श्रीमती सुलभा शिंदेमँडम व श्री कांबळे सर यांनी केले.तसेच कब-बुलबुलच्या पालकांनी दिवसभर शिबीर ठिकाणी हजेरी लावून उस्फुर्त प्रतिसाद दिल्याबद्दल श्रीमती प्रतिभा गांगर्डे यांनी सर्वांचे आभार मानले.