भोगजी च्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ कचर्‍या पासून बनवला रावण - kalayog

१५ ऑक्टोबर, २०२१

भोगजी च्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ कचर्‍या पासून बनवला रावण

भोगजी तालुका कळंब येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ कचऱ्यापासून रावणाचा प्रतीकात्मक पुतळा तयार केला आहे. दसऱ्याच्या साफ-सफाई मध्ये घरातून निघालेला टाकाऊ कचरा  चिंध्या कपडे पालापाचोळा  त्यांचा वापर करून दहनसाठी रावणाचा  पुतळा तयार केला आहे. विजयादशमी हा उत्सव वाईटावर चांगल्याचा विजय या विचाराने  साजरा केला जातो. सध्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे यातूनच या विद्यार्थ्यांना सुचलेली ही कल्पकता  आहे. इयत्ता 7 वी चा विद्यार्थी आशिष भारत आडसुळ व सहकारी व मार्गदर्शक शिक्षक यांनी मिळून ही कल्पना साकारली आहे. याचे कौतुक सर्वत्र केलेजात आहे.