मुसळधार पावसामुळे भोगजी व इतर गावांचा कळंब शी संपर्क तुटला - kalayog

२७ सप्टेंबर, २०२१

मुसळधार पावसामुळे भोगजी व इतर गावांचा कळंब शी संपर्क तुटला

कळंब - गुलाब वादळाचा तडाखा सर्वत्र बसला आहे .रात्रीच्या मुसळधार पावसाने कळंब तालुक्यातील वाशिरा  नदीला पूर आल्यामुळे भोगजी - कळंब मुख्य रस्त्यावरील पूलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे रस्ता बंद झाला आहे. वशिरा चे पाणी शेतातून घुसल्याने शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे.पाणी पुलावरून वाहत असताना कोणीही त्यावरून जा ये करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.