भारत सरकारच्या नवीन स्थापीत सहकार विभागाच्या वतीने पहिले राष्ट्रीय सहकारिता संमेलन इंदिरा गांधी स्टेडियम दिल्ली येथे दि.25/09/2021 रोजी सकाळी 9 ते 1 च्या दरम्यान पार पडले. या संमेलनात देशातील सहकार, क्रुषी, शेतकरी उत्पादक कंपनीचे दोन हजार प्रतिनिधी उपस्थित होते. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून भारत सरकारच्या सहकार विभागाचे सहकारी मंत्री मा.श्री. अमितभाई शहा,प्रमुख पाहुणे म्हणून क्रुषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची प्रमुख उपस्थिती होती. या संमेलनामध्ये भावार्थदीपिका अँग्रो प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष श्री. अशोक लांडगे यांनी आभासी पद्धतीने सहभाग नोंदविला. या संपूर्ण सहकारीता संमेलनाचे प्रक्षेपण आपल्याच गावात पाहण्याची सोय कळंब तालुक्यातील मौजे खोंदला या ठिकाणी कंपनीच्या वतीने करण्यात आली होती. या प्रसंगी कंपनीचे अध्यक्ष श्री. अशोक लांडगे , महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे प्रतिनिधी सचिन कुंभार साहेब, खोंदला गावचे आमचे मार्गदर्शक श्री. निळकंठ नाना लांडगे व सरपंच श्री. निवॄत्ती पवार , ग्रामसेवक श्री. रावसाहेब व उपसरपंच बंडु नाना मुळीक व खोंदला गावचे तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री. अविनाश लांडगे व ग्रामपंचायत सदस्य श्री. बाळासाहेब लांडगे, श्री. शीतलकुमार लांडगे, नारायण दादा लांडगे व श्री. बापूराव लांडगे तसेच श्री.नारायण टेकाळे, श्री. शिवाजी लांडगे, श्री. दादा कदम व कंपनीचे संचालक मंडळ व खोंदला गावचे पुण्यनगरीचे पत्रकार श्री. विलास मुळीक व गावातील कंपनीचे सर्व सभासद यांची उपस्थिती होती.
२६ सप्टेंबर, २०२१
Home
Unlabelled
पहिले राष्ट्रीय सहकारिता संमेलनात भावार्थदीपिका अग्रो प्रोड्युसर कंपनी सहभागी
पहिले राष्ट्रीय सहकारिता संमेलनात भावार्थदीपिका अग्रो प्रोड्युसर कंपनी सहभागी
About Kalayog
कलायोग हे वृत्तपत्र कला, साहित्य,आरोग्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील ठळक घडामोडींचा वेध घेऊन वाचकांना वास्तविकतेचे निष्पक्ष दर्शन घडवते.मुख्य संपादक - शरद बलभीम आडसुळ Call - 9689895852.