ता. कळंब जि.उस्मानाबाद येथील छ्त्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा जिव्हाळा परिवाराचा तिसरा स्नेहमेळावा जय भवानी फंक्शन हॉल कळंब येथे उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रा.बाळकृष्ण भवर ,प्रा. संजय घुले,प्रा. विद्युलता पवार ,ह भ प धनंजय साजेकर, संजय नकाते तर अध्यक्ष म्हणून छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य शशिकांत जाधव सर उपस्थित होते.
यावेळी प्राध्यापक श्री माने सर प्रोफेसर झाल्याबद्दल जिव्हाळा परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. जीव्हाळा परिवाराचे सदस्य श्री दगडू झोंबाडे यांनी मनोरुग्ण व्यक्तीला पुन्हा समाजामध्ये आणण्याचे काम केल्याबद्दल जिव्हाळा परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. सौ मनीषा राखुंडे पाटील यांची राजकीय पक्षाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
*संगीत मैफलीची मेजवानी*
ह भ प धनंजय सांजेकर व त्यांच्या संघाने विविध भक्ती गीते गवळणी यांनी उपस्थित श्रोते वर्गाला मंत्रमुग्ध केले.यावेळी . प्रा घुले सर ,प्रा. किशोर मोरे , श्री वैजनाथ पक्कवे यांनीही विविध गाणी गाण्यांचा आस्वाद उपस्थितांना दिला.
जिव्हाळा परिवारातील सदस्यांनीही या संगीत मैफिलीत रंग भरले
जिव्हाळा परिवाराच्या सौ स्वाती इंगळे भोसले (वहिनी) यांनी
*नेसले ग बाई मी चंद्र काळा* *टिपक्याची । तिरपी नजर माझ्यावर* *या* *सावळ्या हरीची |* ही गवळण गाऊन महाविद्यालयातील आठवणी जागवल्या , प्रा. जगताप सरांनी लहानपन देगा देवा ते मिले सुर मेरा तुम्हारा हे श्रोत्यांना ऐकून संगीत मैफिल मध्ये भक्तिमय वातावरण निर्माण केले.
जिव्हाळा परिवाराचा हरहुन्नरी कलाकार शरद अडसूळ यांनी बासरी च्या धुन मधून *बाई मी विकत घेतला* *श्याम* ही गवळण सादर केली.
या कार्यक्रमात शैलेश शिंदे मनीषा राखुंडे, स्वाती इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमास छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते तसेच जेव्हा परिवाराचे सदस्य बहुसंख्य संख्येने सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक परमेश्वर मोरे सूत्रसंचालन विकास वाघमारे तर आभार प्रदर्शन मदन तांबारे यांनी मानले.