भोगजी ग्रामपंचायत तर्फे शिवस्वराज्य दिन साजरा
भोगजी ता. कळंब येथे ग्रामपंचायत कार्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला या वेळी सरपंच ,ग्रा.प. सदस्य ,शाळेचे मुख्याध्यापक , शिक्षक ,आशाकार्यकर्ती ,बचतगट कार्यकर्ती,सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
देशासह महाराष्ट्र राज्याचे प्रेरणास्थान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून हा दिवस राज्याभिषेक दिन म्हणून साजरा होतो. परंतु यापुढे हा दिवस “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिली होती . राज्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कार्यालयामध्येही शिवस्वराज्य दिन करोनाच्या अनुषंगाने सर्व नियम पाळून हा दिवस साजरा करण्याचे आदेश देण्यात आले होते त्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रात हा उत्सव स्वराज्यगुढी उभारून साजरा झाल्याचे वृत्त आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर अखिल भारत वर्षाचे प्रेरणास्थान आहेत. राष्ट्रनिर्माता असलेल्या या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजे ६ जून १६७४ म्हणजेच शिवराज्यभिषेक दिन . या दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता आणि शिवाजी महाराज छत्रपती झाले होते. याच दिवशी श्री शिवराज्याभिषेक शकाची निर्मिती करून महाराज शक कर्ते ही झाले. महाराजांनी तत्कालीन प्रस्थापित सत्तांना पालथे करून स्वत:च्या सार्वभौम स्वराजाचा पवित्र मंगलकलश जनतेला अर्पण करुन रयतेची झोळी सुख समृध्दीने भरली होती. त्यामुळे हा दिवस शिवस्वराज्य दिवस म्हणून साजरा करण्याची मागणी विविध स्तरातून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने वरील निर्णय घेतला आहे.
६ जून, २०२१
Home
Unlabelled
‘शिवस्वराज्य दिन’ स्वराज्य गुढी उभारून उत्साहात साजरा
‘शिवस्वराज्य दिन’ स्वराज्य गुढी उभारून उत्साहात साजरा
About Kalayog
कलायोग हे वृत्तपत्र कला, साहित्य,आरोग्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील ठळक घडामोडींचा वेध घेऊन वाचकांना वास्तविकतेचे निष्पक्ष दर्शन घडवते.मुख्य संपादक - शरद बलभीम आडसुळ Call - 9689895852.

