कळंब तालुक्यातील हे गाव गेले वर्षभर कोरोणाला खबरदार म्हणून गावात प्रवेश करू देत नव्हते. परंतू हा गाव आता बधिताच्या यादीत आलाय.आजवर येथे पेशंट कसे काय निघत नाहीत याचा प्रश्न सर्वांनाच पडला होता याचे उत्तर म्हणा किव्हा काय ते तर गावातील लोकांनी स्वतःहून आजवर तपासणी केली नव्हती जसं म्हणतात हात दाखवून आवलक्षन तसं झालं. भोगजीत तपासणी पथक बोलावले मग काय निघाले पेशंट. त्यात निघालेल्या बाधितांना फार त्रास अथवा लक्षणे नाहीत असे म्हटले जात आहे.सगळ जग बाधित झालेलं असताना हे गाव कसं अपवाद राहील पण झालं एवढच की सगळीकडे उताराला लागलं आणि या गावात सुरुवात झाली. परंतु गेले वर्षभरात येथे पेशंट कसे काय निघाले नाहीत याचे मात्र आश्चर्य आहे.
१ जून, २०२१
Home
Unlabelled
होय भोगजी पण कोरोना सकारात्मक झालीय बरका.
होय भोगजी पण कोरोना सकारात्मक झालीय बरका.
About Kalayog
कलायोग हे वृत्तपत्र कला, साहित्य,आरोग्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील ठळक घडामोडींचा वेध घेऊन वाचकांना वास्तविकतेचे निष्पक्ष दर्शन घडवते.मुख्य संपादक - शरद बलभीम आडसुळ Call - 9689895852.