खोंदला ता. कळंब येथील भावार्थदिपीका अॅग्रो प्रोड्युसर लि. या कंपनीला नुकतीच उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे खासदार श्री ओमराजे निंबाळकर व उस्मानाबाद कळंब विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री कैलास दादा घाडगे पाटील यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली.
ते खोंदला पाटी ते मांजरानदी रस्त्याच्या लोकार्पन सोहळ्यासाठी गावात आले होते . यावेळी त्यांसोबत युवा सेनेचे महाराष्ट्र प्रदेश विस्तारक श्री नितीन दादा लांडगे, कळंब शिवसेना तालुकाप्रमुख श्री शिवाजी आप्पा कापसे , कळंब शिवसेना शहरप्रमुख श्री प्रदिप मेटे,शिराढोन सर्कलचे जि .प . सदस्य बालासाहेब जाधवर, कळंब विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष श्री मंदार मुळीक,खोंदला गावचे सरपंच श्री निवृत्ती तात्या पवार , उपसरपंच श्री बंडु नाना मुळीक तसेच जिव्हाळा परिवार कळंब चे सदस्य भूजंग लोकरे, शैलेश शिंदे, परमेश्वर मोरे उपास्थित होते.
यावेळी कंपनीचे अध्यक्ष श्री अशोक लांडगे यांनी मान्यवरांना ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतीमा भेट देऊन सन्मान केला. मा. खा. ओमराजे निंबाळकर व आ. कैलास दादांनी कंपनीच्या कामकाजाची माहिती घेतली व समाधान व्यक्त केले. तसेच भाविष्या परिसरातील शेतकऱ्यांना फायदयाच्या दृष्टीने सीड प्रोग्राम, स्मार्ट प्रकल्प यावर कंपनीने काम करावे तसेच काही अडचन असल्यास आम्हाला सांगा त्या आपन सोडऊ असे आश्वासन दिले.