कळंब :डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित छत्रपती शिवाजी महाविद्यालय,कळंब व आयक्युएसी/रासेयो विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात २४ सप्टेंबर रासेयो स्थापना दिवसाच्या निमित्त बुधवार दि. 24/09/2025 रोजी 'राष्ट्रीय सेवा योजना दिन' निमित्ताने महाविद्यालयांत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरवात प्रथमतः छ.शिवाजी महाराज, महात्मा गांधी,संत गाडगेबाबा व संस्थेचे संस्थापक कै. नरसिंग(आण्णा) यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाध्यक्ष प्राचार्य.डॉ.हनुमंत माने, प्रमुख मार्गदर्शक एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा.मनिषा कळसकर मॅडम,प्रा. अभिमान ढाणे, आयक्युएसी समन्वयक डॉ.अनिल जगताप व प्रा. शफीक चौधरी या मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाधिकारी प्रा.मनिषा कळसकर यानी रासेयोनेच्या स्वयंसेवकांना 'राष्ट्रीय सेवा योजना' दिनाचे महत्त्व पटवून दिले.तसेच देशाचा विकास साधण्यासाठी महाविद्यालयीन स्तरावर युवकांमध्ये नवचेतना निर्माण व्हावी यासाठी रासेयो विभागा मार्फत वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी व्हावे असे आव्हान केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य.डॉ. हनुमंत माने स्वच्छतेचे महत्त्व तसे श्रमदानाच्या माध्यमातून देशसेवचे महत्व पटवून सांगितले. यावेळी विद्यार्थी प्रिय प्राध्यापक डॉ. आनंत नरवडे ,डॉ. रघुनाथ घाडगे, प्रा. पंडित शिंदे, प्रा. शशिकांत जाधवर, डॉ. उद्धव गंभीरे ,डॉ. हंडीबाग सर, प्रा.शिव खबाले, प्रा.सोमनाथ कसबे, डॉ. महावीर गायकवाड, प्रा. अमर खबाले, प्रा. सुनिता चोंदे, एनएसएस विद्यार्थी प्रतिनिधी कु. बचुटे यांचा राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे गौरव व सन्मान करण्यात आला. रासेयो दिना निमित्त श्रमदानाच्या माध्यमातून सर्व स्वंयसेवक व कर्मचारी यानी मिळून महाविद्यालयातील परिसर स्वच्छ केला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.शफीक चौधरी व प्रास्ताविक प्रा.अभिमान ढाणे यानी केले व आभार डॉ.अनिल जगताप यांनी मानले.या वेळी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्ता गायकवाड,दतात्रय कांबळे तसेच सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
२९ सप्टेंबर, २०२५
Home
Unlabelled
छत्रपती शिवाजी महाविद्यालयात रासेयो दिन साजरा
छत्रपती शिवाजी महाविद्यालयात रासेयो दिन साजरा
About Kalayog
कलायोग हे वृत्तपत्र कला, साहित्य,आरोग्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील ठळक घडामोडींचा वेध घेऊन वाचकांना वास्तविकतेचे निष्पक्ष दर्शन घडवते.मुख्य संपादक - शरद बलभीम आडसुळ Call - 9689895852.
