जि .प .प्रशाला ईटकुर चे विज्ञान शिक्षक माननीय श्री तुकाराम गरुडे सर यांना मान्यवरांच्या हस्ते जिल्हास्तरीय विज्ञान शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी उमरगा लोहारा विधानसभा आमदार श्री. प्रवीण वीरभद्रया स्वामी ,डॉ.श्री.दयानंद जटनुरे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,धाराशिव श्री.संतोष माळी शिक्षण योजना अधिकारी आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्काराचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन ज्ञान प्रबोधिनी केंद्र,हरळी ता.लोहारा येथे आयोजित करण्यात आला होता या वेळी कळंब तालुका विज्ञान मंडळाचे सदस्य ,इटकुर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.चंद्रकांत शिंदे सर , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.दादा पावले ,जाधव सर, पसारे सर व धाराशिव जिल्ह्यातील विविध तालुक्यातून मोठ्या संख्येने शिक्षक बांधव उपस्थित होते.
