कळंब : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजीनगर, सलंग्नित, छत्रपती शिवाजी महाविद्यालय,कळंब व जिजाऊ युवती मंच /आयक्युएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०८ मार्च २०२५ शनिवार रोजी महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिनानिमित्"महिला दिन "या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ.हनुमंत माने व प्रमुख मार्गदर्शक प्रा.मनिषा कळसकर होते.प्रमुख उपस्थितिमध्ये प्रा. डॉ.विद्युलता पवार ,प्रा.सुनिता चोंदे आणि प्रा. जोशी मॅडम उपस्थित होत्या.या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मान्यवरांचे शाल,पुष्पगुच्छ देऊन महाविद्यालयाच्या वतीने स्वागत केले.कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक प्रा.मनिषा कळसकर मॅडम यांनी जागतिक महिला दिनानिमित्त उपस्थित असलेल्या विद्यार्थी व विद्यार्थींनीना संबोधित करताना महिलांचे अधिकार,त्यांचे शिक्षण महिलांच्या समस्या तसेच बालविवाह थांबणे काळची गरज या विषयी सखोल मार्गदर्शन केले.यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये उपस्थित असणा-या प्रा.डॉ.विद्युलता पवार आणि प्रा.सुनिता चोंदे यांनी महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय समारोप करताना प्रा. डॉ.हनुमंत माने यांनी भारताची संस्कृती कशी महान आहे आणि ती टिकवून ठेवण्यासाठी महिलांचे मोठे योगदान कसे आहे हे सांगून समाजातील स्त्रियांचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्य करणार्या देशातील महान स्त्रिया विषयी सखोल मागदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.शफीक चौधरी व सूत्रसंचालन प्रा.डाॅ.अनंत नरवडे यांनी केले.आभार कु.प्रतिज्ञा कांबळे यांनी मानले.या कार्यक्रमाला विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिजाऊ युवती मंच,सदस्या प्रा.कळसकर मॅडम,प्रा. सुनिता चोंदे मॅडम, डॉ.विद्युलता पवार मॅडम तसेच , सुंदर कदम,दत्तात्रय गायकवाड ,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
८ मार्च, २०२५
Home
Unlabelled
छत्रपती शिवाजी महाविद्यालयात 'महिला दिन' साजरा
छत्रपती शिवाजी महाविद्यालयात 'महिला दिन' साजरा
About Kalayog
कलायोग हे वृत्तपत्र कला, साहित्य,आरोग्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील ठळक घडामोडींचा वेध घेऊन वाचकांना वास्तविकतेचे निष्पक्ष दर्शन घडवते.मुख्य संपादक - शरद बलभीम आडसुळ Call - 9689895852.
