ईटकूर प्रशालेत वृक्षारोपण - kalayog

२ ऑगस्ट, २०२४

ईटकूर प्रशालेत वृक्षारोपण

 

ईटकूर :  कळंब तालुक्यातील ईटकुर येथील जिल्हा परिषद प्रशाले लोकसहभागातून आणलेल्या 21  वृक्षांचे वृक्षारोपण प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा परिषद प्रशालेमध्ये आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी सरपंच सौ मोहरबाई कस्पटे, प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच विलास गाडे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिदास पावले, सचिन गंभीरे, माजी उपाध्यक्ष प्रभाकर आडसुळ,ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण आडसूळ, अभयसिंह आडसुळ,मुख्याध्यापक शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा परिषद प्रशालेच्या  माजी शाळा व्यवस्थापना समिती व शिक्षक वृंद यांच्या संयुक्त विद्यमाने  लोकसहभागातून 21 नारळ या वृक्षाचे रोपटे आणून  प्रशालेच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण करण्यात आले तसेच प्रत्येक शिक्षकाने एक झाड दत्तक घेऊन संगोपन करण्याची जबाबदारी घेतली. 
या कार्यक्रमासाठी   संतोष एकशिंगे ,वाल्मीक कोळी, पत्रकार अजित गायके, वल्लभ पोते,  दादा सुरवसे, राजाभाऊ गाडे, संजय आरकडे, रविकांत कुलकर्णी,विजय देसाई, मनीषा काळे सह पालक ग्रामस्थ शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.