मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कळंबकरांनी घेतला कवीसंमेलनाचा आस्वाद... - kalayog

२९ फेब्रुवारी, २०२४

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कळंबकरांनी घेतला कवीसंमेलनाचा आस्वाद...

 



दि.२८,कळंब- कळंब तालुका पत्रकार संघ,हेल्दी ग्रुप कळंब व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद शाखा कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वर्ष दुसरे कवीसंमेलन व शब्दपेरणी कवितासंग्रह चर्चासत्र सह्याद्री हॉस्पिटल मोहा रोड कळंब या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम पाटील,(वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय कळंब), प्रमुख उपस्थिती  सतीश टोणगे (पत्रकार दैनिक एकमत), शितलकुमार घोंगडे (पत्रकार दैनिक दिव्यमराठी), आश्रुबा कोठावळे (अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कळंब तालुका अध्यक्ष )
 प्रा.श्री.जगदीश गवळी,प्रा.श्री.दादाराव गुंडरे,प्रा. श्री.बाळकृष्ण भवर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते कवी वि. वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेचे पूजन करुन उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत हेल्दी ग्रुपच्या वतीने करण्यात आले व कविसंमेलन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. 
या कवीसंमेलनामध्ये महादेव गपाट सर ,संतोष लिमकर,सोपान पवार, श्रीम.अंजली यादव (चाळक) ,दिलीप मोरे, आश्रुबा कोठावळे, डॉ.श्रीम.शोभा पाटील,श्रीम.पुष्पा बुरकुले (निन्हाळ), नवोदित कवी प्रीतम वेदपाठक,रमेश शिंदे ,हर्षवर्धन पाटील यांनी अतिशय सुंदर अशा विविध विषयावरती कविता सादर करुन या कवीसंमेलनामध्ये रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमाची सुरुवात "लाभले आम्हास भाग्य आम्ही बोलतो मराठी" या सुंदर अशा गीताने डॉ. श्रीम.शोभा पाटील यांनी केली.तर देव देव्हाऱ्यात नाही या सुंदर अभंगाचे गायन करत श्रीम. पुष्पा बुरकुले यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.गझल - विझलो आज जरी मी,हा अंत माझा नाही, पीक झाले कुपोषित,आई, माझी मराठी आहे महाराष्ट्राची शान, नव्या युगाकडे घेऊन जाणारा रस्ता आपण शोधला पाहिजे, गांधीजींची अहिंसा, ओळखलतं का सर मला, तुझा हात परिस, माय मराठीचे वीर पुत्र आम्ही, उजेड वाटा , आयुष्यचं ते, पाऊस आला,जिजाऊ आज तुम्ही असता तर, माझगाव, बाप वाळूतल ऊन, जातं, गावाकडं चल माझ्या दोस्ता, सांगा कसं जगायचं अशा विविध विषयावर कवींनी आपल्या कविता सादर केल्या.तर प्रा.बाळकृष्ण भवर यांनी सर्व कवींनी सादर केलेल्या कवितांचा सार घेत अतिशय सुंदर अशी शिघ्र कविता सादर केली.व उपस्थितांची मने जिंकली.

शब्दपेरणी बालमनातील" या पुस्तकावर चर्चासत्रात प्रा. बाळकृष्ण भवर यांनी पुस्तकाचा सविस्तर धोंडाळा घेतला बालकविताही लिहिण्यासाठी लहान  व्हावं लागतं असेही म्हणाले व लहानपणीचे काही किस्से त्यांनी सांगितले शब्द पेरणी या पुस्तकात  ग्रामीण भागातल्या कविता आहेत व त्यांनी शब्द पेरणीचे कौतुक केले व लहान मुलांसाठी उपयुक्त असा हा कवितासंग्रह आहे.

तसेच प्राध्यापक जगदीश गवळी सर यांनी शब्द पेरणी या पुस्तकावर बोलताना म्हणाले की हा केवळ शब्दपेरणी संग्रह नाही तर संस्काराचा ठेवा आहे या कवी संग्रहात शेती मातीच्या कविता शेतात पेरणी करणारा कवी पाणी नाती, माती गोती त्यांनी यात मांडलेले आहेत व साहित्य क्षेत्रात या बालकविता संग्रहाची लहान मुलावर संस्कार करण्यासाठी खूप मदत होईल व तो एक मैलाचा दगड ठरेल असे म्हणाले.
तसेच आश्रुबा कोठावळे लिखित शब्दपेरणी बालमनातील या पुस्तकावर चर्चासत्रात प्रा. बाळकृष्ण भवर यांनी पुस्तकाचा सविस्तर धोंडाळा घेतला बालकविताही लिहिण्यासाठी लहान  व्हावं लागतं असेही म्हणाले व लहानपणीचे काही किस्से त्यांनी सांगितले शब्द पेरणी या पुस्तकात  ग्रामीण भागातल्या कविता आहेत व त्यांनी शब्द पेरणीचे कौतुक केले व लहान मुलांसाठी उपयुक्त असा हा कवितासंग्रह आहे.

तसेच प्राध्यापक जगदीश गवळी सर यांनी शब्द पेरणी या पुस्तकावर बोलताना म्हणाले की हा केवळ शब्दपेरणी संग्रह नाही तर संस्काराचा ठेवा आहे या कवी संग्रहात शेती मातीच्या कविता शेतात पेरणी करणारा कवी पाणी नाती, माती गोती त्यांनी यात मांडलेले आहेत व साहित्य क्षेत्रात या बालकविता संग्रहाची लहान मुलावर संस्कार करण्यासाठी खूप मदत होईल व तो एक मैलाचा दगड ठरेल असे म्हणाले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित पत्रकार माधवसिंग राजपूत,शिवाजी सावंत,रमेश अंबिरकर, संभाजी गिड्डे, सलमान मुल्ला हे पत्रकार बंधु उपस्थित होते.तसेच राजेंद्र बिक्कड,पद्माकर माने, उत्तम सावंत, विष्णु मस्के,उद्धव काळे,सतीश डिकले,निळकंठ वाघमारे,पप्पू मडके,दत्तात्रय  गाडे ,भाऊसाहेब देशमुख, नवनाथ आडसूळ  हेल्दी ग्रुप सदस्य व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश टोणगे,बापु भंडारे,आश्रुबा कोठावळे,बाळासाहेब कांबळे,दिनकर बाकले,पोपट साळवे,दादाराव पवार,प्रशांत निन्हाळ,वैभव कोठावळे,सतीश तोडकर,विठ्ठल पुट्टेवाड, राजेंद्र लोकरे या सर्वांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आश्रुबा कोठावळे,सूत्रसंचालन भंडारे बापु यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सतीश टोणगे यांनी मांडले.