छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये 'मराठी भाषा गौरव दिन'साजरा - kalayog

२९ फेब्रुवारी, २०२४

छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये 'मराठी भाषा गौरव दिन'साजरा

 

कळंब : येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये वि. वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त  'मराठी भाषा गौरव दिन' दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी साजरा करण्यात आला .यावेळी विष्णु वामन शिरवाडकर, संस्थेचे संस्थापक कै. नरसिंग (अण्णा) जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य जाधवर एस. एस.हे होते तर या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ.हनुमंत माने हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना कुसुमाग्रजांच्या साहित्याची आणि कार्याचीओळख करून दिली. व्यासपीठावर आयक्यूएशीचे समन्वयक प्रा.डॉ.अनिल जगताप तसेच श्रीमती कळसकर मॅडम प्रमुख उपस्थितीमध्ये उपस्थित होत्या.यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी 'काव्यवाचन स्पर्धा'  घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या स्वरचित कवितेचे सादरीकरण केले . अध्यक्षीय समारोपामध्ये प्राचार्य जाधवर एस. एस.यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व पटवून दिले.तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केला पाहिजे असे मत व्यक्त केले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकास ३५० वर्षं पूर्ण झाली त्या निमित्ताने निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये  प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. अनिल जगताप यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.