छत्रपती शिवाजी महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त बक्षीस वितरण - kalayog

२० ऑक्टोबर, २०२३

छत्रपती शिवाजी महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त बक्षीस वितरण

कळंब - छत्रपती शिवाजी महाविद्यालय  कळंब व आयक्यूएसी / रासेयो विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न मिसाईलमॅन डॉ.ए .पी.जे .अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी  माझी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे सचिव माननीय शिवाजी आप्पा कापसे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष माननीय बाळकृष्ण गुरसाळे सहसचिव मा.प्रा.संजय घुले यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. विद्युलता पवार यांनी केले वाचनाचे महत्त्व व विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड कमी होत असल्याचे मत व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य शशिकांत जाधवर यांची उपस्थिती होती यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाचन संस्कृती टिकली पाहिजे त्याकरिता विद्यार्थ्यांनी नियमित वाचन करावे असे मत व्यक्त केले यावेळी ग्रंथालय विभागाच्या वतीने तीन तास वचन स्पर्धा महाविद्यालयात घेण्यात आली या स्पर्धेतील विजेत्यांना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रथम कु. गायत्री चोंदे व द्वितीय कु. साधना माने यांना अनुक्रमे बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मनीषा कळसकर व आभार प्रा. ज्योतीराम जाधव यांनी मानले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.