छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या रोहित भोसलेचे कुस्ती स्पर्धेत यश - kalayog

१९ ऑक्टोबर, २०२३

छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या रोहित भोसलेचे कुस्ती स्पर्धेत यश


कळंब : दि.१३/१०/२०२३ रोजी नळदुर्ग तालुक्यातील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात 'अंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेचे आयोजन' करण्यात आले होते.यावेळी कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या.यामध्ये छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब च्या रोहित भोसले याने ६५ किलो वजनी कुस्ती क्रिडा स्पर्धे मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.या यशाबद्दल त्याचा विद्यापीठाच्या वतीने ट्रॉफी मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.तसेच वरील स्पर्धेमध्ये यश संपादन केल्याबद्दल कॉलेज तर्फे संस्थेचे सहसचिव मा.संजयजी घुले व कोषाध्यक्ष श्री.बाळकृष्ण गुरसाळे भाऊ व क्रिडा मार्गदर्शक शिवकुमार खबाले यांच्या वतीने रोहित भोसलेचा शाल,श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ.हनुमंत माने डॉ.रघुनाथ घाडगे डॉ.अनंत नरवडे प्रा.पंडित शिंदे प्रा.अनिल जगताप,जयसिंग चौधरी,किशोर फावडे व दत्ता गायकवाड यांच्यासह प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी या सर्वानी रोहित भोसलेचे कौतुक केले.या यशा साठी क्रीडा मार्गदर्शक शिवकुमार खबाले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.