कळंब प्रतिनिधी- कळंब जि. धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.अनंत नरवडे यांना महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद , जिल्हा.नांदेड च्या वतीने देण्यात येणारा मानाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.प्रा.डाॅ.नरवडे हे गेल्या 25 वर्षापासुन अर्थशास्त्र विषयाचे अध्यापन करत आहेत.त्याचे अर्थशास्त्र विषयावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर 26 शोधनिबंध प्रकाशित आहेत.या कालखंडात केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद नांदेड च्या वतीने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे सचिव शिवाजी (आप्पा) कापसे, संस्थेचे अध्यक्ष श्याम (नाना )खबाले संस्थेचे सहसचिव संजय घुले सर संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.अविनाश मोरे सर कोष्याअध्यक्ष बाळकृष्ण गुरसाळे साहेब, प्राचार्य शशिकांत जाधवर व सर्व सहकाऱ्यांनी अभिनंदन केले.
३ सप्टेंबर, २०२३
Home
Unlabelled
प्रा.डाॅ.अनंत नरवडे राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित
प्रा.डाॅ.अनंत नरवडे राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित
About Kalayog
कलायोग हे वृत्तपत्र कला, साहित्य,आरोग्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील ठळक घडामोडींचा वेध घेऊन वाचकांना वास्तविकतेचे निष्पक्ष दर्शन घडवते.मुख्य संपादक - शरद बलभीम आडसुळ Call - 9689895852.