जीवन गुणगौरव या पुरस्काराने महादेव महाराज आडसुळ ईटकुरकर सन्मानित. - kalayog

२ डिसेंबर, २०२२

जीवन गुणगौरव या पुरस्काराने महादेव महाराज आडसुळ ईटकुरकर सन्मानित.

कळंब: बंधुभाव, वारकरी संतांना अभिप्रेत समाज तयार व्हावा यासाठीचे कार्य, पर्यावरणासाठी पोषक वृक्षारोपन वृक्ष संवर्धन तथा निराश्रीत बालक, जेष्ठ नागरिक यांच्यासाठी होत असलेले कार्य या व असा अनेक कामाचा गौरव म्हणून सद्गुरु बहुउद्देशीय संस्था टेंभुर्णी व Aग्रुप बाबळगाव तालुका माढा यांच्या वतीने समाजात मानाचा समजला जाणारा जीवन गुणगौरव हा पुरस्कार कळंब जिल्हा उस्मानाबादचे महादेव महाराज आडसुळ ईटकुरकर यांना सन्माननीय विक्रम दादा शिंदे, शशिकांत काका देशमुख, आप्पासाहेब देशमुख, अण्णाजी देशमुख ,ए ग्रुपचे भागवत जी पराडे बाबळगावकर, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष रिजवान शेख इंदापूर, डॉक्टर ब्रम्हाकुमारी प्रतिभाबेन ,मा पोलीस निरीक्षक बापू शिंदे निमगाव , प्राचार्य कपाट सर, सुफी सय्यद ,संदीप कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ईश्वरी शक्तीचा मानवी अवतार म्हणजे सप्तगुणी जय भगवान नानजीभाई ठक्कर ठाणावाला मुंबई व दशरथ महाराज महाडिक देशमुख टेंभुर्णीकर यांच्या शुभ हस्ते नुकताच दिमागदार भव्य सोहळ्यामध्ये जीवन गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.