सावधान! रस्त्यावर जागोजागी अपघाताचे सापळे? - kalayog

२८ नोव्हेंबर, २०२२

सावधान! रस्त्यावर जागोजागी अपघाताचे सापळे?


कळंब तालुक्यतील वेगवेगळ्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून रात्रीचा प्रवास करत असाल तर सावधान. सध्या ऊस वाहतुकीच्या अवजड वाहनाने रस्त्यावरील झाडांच्या फांद्या मोडून अगदी रस्त्याच्या मधोमध लोंबत आहेत त्या रात्रीचा अंधारात दिसून येत नाहीत तेव्हा दुचाकीवरून रात्रीचा प्रवास करणाऱ्यांसाठी धोका आहे मागील चार-पाच दिवसांपासून त्या रस्त्यावर तशाच पद्धतीने लोंबत आहेत याकडे रस्ते व्यवस्थापनाचे लक्ष नाही असे दिसून येते तरी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी स्वतःच काळजी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कित्येक वर्ष आपली ओळख ठेवून असलेल्या गुडघाभर खड्ड्यातून भरलेल्या उसाची गाडी ओढताना बैलांची आकडी पिळवटून निघते मुक्या प्राण्याच्या जीवाचा तरी नेहते,पुढारी जाणते,अधिकारी कर्मचारी यांच्याकडून विचार व्हायला हवा असे लोकांचे मत आहे