"मन की बात" कार्यक्रमाचे कळंब येथे आयोजन - kalayog

२५ सप्टेंबर, २०२२

"मन की बात" कार्यक्रमाचे कळंब येथे आयोजन



कळंब: - भारताचे कणखर पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी आपल्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाला संबोधित करतात. 
यावेळी मन की बात 92 वा कार्यक्रमाचे आयोजन स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, कळंब येथे सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करण्यात आला. 
यासाठी ज्येष्ठ व्यापारी  नंदलाल तापडिया, ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हा अध्यक्ष ह.भ.प. महादेव महाराज आडसुळ,  प्रकाशकाका भडंगे, ज्येष्ठ नेते  नागनाथ घुले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक  अरुण चौधरी, भाजपा तालुका उपाध्यक्ष  बजरंग शिंदे, भारतीय जनता युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रशांत लोमटे, जिल्हा परिषद सदस्य  सुरेश कोरे, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन  अनिल टेकाळे,  सतीष टेकाळे,  शहराध्यक्ष  संदिप बाविकर, अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपउपाध्यक्ष मिनहाज शेख, अ.जा.मो. प्रदेश कार्यकारिणी सदस्य  सतपाल बनसोडे,  आबासाहेब फरताडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष  रोहित कोमटवार, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष  संताजी वीर, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस परशुराम देशमाने,  गोपाळ चोंदे,  बाबुराव शेंडगे,  नारायण टेकाळे, माजी सैनिक  मुकुंद धायगुडे,  गणेश जावळे,  अरविंद कदम,  सचिन जाधवर, धनंजय बोंदर,  आदित्य शिंदे,  किशोर माने व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मकरंद पाटील, ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य  शिवाजी शेंडगे, मन की बात तालुका संयोजक  संजय जाधवर यांनी केले होते.