गणेशोत्सवात देवी देवता अवतरल्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून - kalayog

११ सप्टेंबर, २०२२

गणेशोत्सवात देवी देवता अवतरल्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून

 
कळंब: गणेशोत्सवातील विसर्जनाच्या मिरवणुकीत विविध देवदेवतांची वेशभूषा धारण केलेले कलाकार मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीतून प्रवास करत पावसाने भिजू नये म्हणून छत्र्या डोक्यावर घेऊन  येत असल्याचा  प्रसंग प्रेक्षकांना पाहायला मिळाला. कोविड च्या दोन वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर यावर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा झाला. कळंब शहरातील विविध गणेश मंडळांनी सामाजिक, इतिहास विषयावरील वेगवेगळे देखावे सादर केले होते. शिव सेवा तालीम संघ यांनी बालकांचे लेझीम पथक विविध नृत्यआविष्कार व त्याचबरोबर धार्मिक प्रसंग देखावा प्रेक्षकांना वेगळाच आनंद देऊन गेला. कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षा व्यवस्था अगदी चोखपणे ठेवण्यात आली होती. नगर परिषद कळंब तर्फे गणेश मूर्ती विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली होती. शांततेत आणि भावपूर्ण  वातावरणात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देऊन गणेशोत्सव साजरा झाला.