कळंब तालुक्यातील भोगजी येथील सर्वोदय विद्यालयात दि.5 जुलै 2022 रोजी मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे राजेंद्र बिक्कड सर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहराच्या तुलनेत सुविधा नसताना देखील सर्व परिस्थितीवर मात करत यशस्वी होतात फक्त त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सांगितले त्याचबरोबर बालासाहेब चौधरी सर यांनी कुठलाही न्यूनगंड न बाळगता किंवा मिळत नसलेल्या सुविधांची कारणे न सांगता उपलब्ध साधनांच्या व गुरुजनांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांनी अभ्यास केला तर निश्चित यश मिळते याचेच उदाहरण हे यशस्वी विद्यार्थी आहेत असे सांगितले या प्रसंगी गुणवंत विद्यार्थी 1)सारा रामराज धुमाळ=92.60% 2)आडसुळ ज्ञानेश्वरी भारत=90.40% 3)घुले गायत्री श्रीहरी=88.80% असे विद्यालयातुन प्रथम,द्वितीय, तृतीय यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला विद्यालयाचा या वर्षी 100 टक्के निकाल लागला आहे.या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सचिव संजय जाधवर अध्यक्ष म्हणून तर प्रमुख पाहुणे राजेंद्र बिक्कड सर, बालासाहेब चौधरी सर, तर पालक शरद आडसुळ, रामराज धुमाळ, शाळेचे मु.अ.गौतम जाधवर सर हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन वाघमारे सर यांनी केले व आभार प्रदर्शन मुंढे सर यांनी केले.
५ जुलै, २०२२
Home
Unlabelled
सर्वोदय विद्यालय भोगजी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
सर्वोदय विद्यालय भोगजी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
About Kalayog
कलायोग हे वृत्तपत्र कला, साहित्य,आरोग्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील ठळक घडामोडींचा वेध घेऊन वाचकांना वास्तविकतेचे निष्पक्ष दर्शन घडवते.मुख्य संपादक - शरद बलभीम आडसुळ Call - 9689895852.