दिनांक २६ डिसेंबर २०२१ रविवार रोजी खोंदला येथील भावार्थदिपीका ॲग्रो प्रोडयुसर कंपनी लि. व मुक्ताई क्लिनिक कळंब यांच्य संयुक्त विदयमाने खोंदला गावामध्ये शुगर व बीपी मोफत तपसणी शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिराची सुरवात ज्ञानेश्वर माऊली व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या कार्यक्रमासाठी खोंदला गावचे सरपंच श्री निवृत्ती तात्या पवार, उपसरपंच श्री बंडु नाना मुळीक आणि गावातील ज्येष्ठ नागरिक श्री. शिवाजी लांडगे, श्री विश्वनाथ लांडगे उपस्थित होते त्याचारोबर ग्रामपंचायत सदस्य श्री. बालासाहेब लांडगे श्री. बापूराव लांडगे, श्री.शीतलकुमार लांडगे, व श्री. बिबीशन बापू कांबळे यांनी स्वतः तपासणी करून सहभाग नोंदवला. शिबिराचे प्रास्तविकमध्ये कंपनी विषयीची माहिती व उद्देश कंपनीचे अध्यक्ष श्री अशोक लांडगे यांनी सविस्तर सांगितले. तसेच श्री डॉ सावंत साहेब यांनी उपस्थितांना आरोग्य विषयी सखोल मार्गदर्शन केले यासोबतच श्री. अविनाश लांडगे यांनी कंपनीचे शेतकरी विषयी केले जाणारे कार्य सविस्तर मनोगतामध्ये विषद केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री प्रकाश लांडगे यांनी केले तर आभार शितलकुमार लांडगे यांनी मानले.
शिबिरास फार मोठ्या संख्येने गावातील लोकांनी उपस्थिती लावली व एकुण 54 लोकांनी सहभाग घेत शुगर व बीपी तपासणी करून घेतली. लोकांच्या आरोग्य संदर्भात डॉ. सावंत (एम.बी.बी.एस, एम.डी) यांनी सखोल मार्गदर्शन करून शिबिराची सांगता झाली.