नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत वानेवाडी, भोसा येथे शेतीशाळा संपन्न - kalayog

२८ नोव्हेंबर, २०२१

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत वानेवाडी, भोसा येथे शेतीशाळा संपन्न

 
तालुका भुम. कृषी अधिकारी कार्यालय भूम , या अंतर्गत श्री शुक्राचार्य भोसले (उपविभागीय कृषी अधिकारी,भूम ) यांच्या मार्गदर्शन खाली शेतीशाळा आयोजित करण्यात आली होती . यावेळी 
निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क,एकात्मिक कीड व्यवस्थापण, पाणी व्यवस्थापन ,गांडूळ खत, प्रकल्पा अंतर्गत असलेल्या वयक्तिक लाभाच्या योजना शेतकरी /उत्पादक संस्था यांच्या साठी असलेल्या योजना ची माहिती शेतीशाळेत सांगितली ,  तसेच महिलां स्वावलंबी बनवल्या पाहिजे या साठी सेंद्रीय शेती आणि इतर जोडधंदे या बद्दल सखोल माहिती देण्यात आली
यावेळी  शेतकरी आणि गावातील लघु उद्योजक महिला उपस्थित होत्या कृषी शेतीशाळा समन्वयक अजयकुमार कोळी यांनी तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी मारूका या रोगा बद्दल मार्गदर्शन केले तसेच त्यावरील जैविक व रासायनिक उपाययोजना बाबत माहिती दिली,शेतीशाळा प्रशिक्षक बालाजी धाबेकर, ओंकार उंदरे, आशा सुतार, आशमा सोनवणे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.