पिकांचे हाल पाहून बळीराजाचा घसा कोरडा - kalayog

९ ऑगस्ट, २०२१

पिकांचे हाल पाहून बळीराजाचा घसा कोरडा

कळंब तालुका  परिसरातील  पीके पावसा अभावी धोक्यात आली आहेत.पेरणी  वेळेला वेळेवर पडलेल्या पावसाने बळीराजाने मोठ्या जोमात कामाला सुरुवात केली कोरोना  संकटाचा खंबीर सामना करत जीवावर उदार होऊन शेतात कष्टाने हिरवा केलेला शिवार पावसा अभावी डोळ्यासमोर खाक होताना दिसत आहे. सोयाबीनचे पीक सद्या फुलोऱ्यात आहे नेमक्या याच वेळेला पावसाने ओढ दिल्याने उत्पन्नात घट होणार आहे यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे.