धाराशिव, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या हस्ते आज 1 जुलै रोजी अप्पर जिल्हाधिकारी यांचे कोर्टरूम येथे प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सन्मानित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव,उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव, उपजिल्हाधिकारी सर्वश्री उदयसिंह भोसले,प्रवीणकुमार धरमकर,संतोष भोर,संतोष राऊत,जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे,निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अरुणा गायकवाड,कळंब उपविभागीय अधिकारी संजय पाटील,भूम उपविभागीय अधिकारी श्रीमती वैशाली पाटील,उमरगा उपविभागीय अधिकारी गणेश पवार,धाराशीव उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे,जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे,जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पुरुषोत्तम रुकमे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी सर्वश्री सूर्यकांत भुजबळ,श्याम गोडभरले,डी.एम.गिरी, मुख्य वित्त लेखा अधिकारी सचिन इगे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.इस्माईल मुल्ला, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश बारगजे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, सहजिल्हा निबंधक आर.जी.जानकर, विशेष भूसंपादन अधिकारी प्रमोद गायकवाड,कार्यकारी अभियंता एस. के.चव्हाण,कार्यकारी अभियंता (विद्युत) चंद्रकांत चाकोते, उपअभियंता गजानन शिरसाळकर, आर.जे.अकेले,सहायक अभियंता प्रीती घोरपडे,कार्यकारी अभियंता (ग्रामीण रस्ते विकास संस्था) अझरुद्दीन सय्यद,जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार, भारत संचार निगमचे सहाय्यक व्यवस्थापक व्ही.के.बोयणे,शासकीय तंत्रनिकेतन प्राचार्य शशिकांत पंखे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,जिल्हा सहआयुक्त (नगरपालिका प्रशासन) रामकृष्ण जाधवर, शासकीय तंत्रनिकेतनचे अधिव्याख्याता राहुल तपकिरे, व्यंकटेश नागापुरे,सागर रोकडे, तहसीलदार सर्वश्री प्रवीण पांडे, संतराम भिसे,ज्योती चव्हाण,मृणाल जाधव,अरविंद बोळंगे,गोविंद येरमे, काशिनाथ पाटील,जयवंत पाटील, घनश्याम आडसूळ,राजेश लांडगे, विजय अवधाने,सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत कुंठला, श्रीमती प्रीतम कुंटला,धाराशिव मुख्याधिकारी वसुधा फड,नायब तहसीलदार अर्चना मैदर्गी,नायब तहसीलदार सचिन पाटील व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे यांना सन्मानित करण्यात आले.

