
धाराशिव तालुक्यातील येडशी येथील श्री संत रामकृष्ण भाऊ ,भगवान भाऊ ,परमेश्वर महाराज (आश्रम ) मंदिर व मृदंगाचार्य जालिंदर (बप्पा ) सस्ते वारकरी सेवा मंडळ संचलित वारकरी शिक्षण संस्था व संगीत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2024 व 25 या वर्षासाठी मोफत दहा विद्यार्थ्यांना मृदंगवादन व वारकरी संप्रदायातिल भजन , हारिपाठ, दिंडी पाऊले, गीतापाठ आदि वारकरी सांप्रदाईक यांचे शिक्षण देण्यात येईल असे आवाहान आश्रम संस्थान चे धार्मिक कार्यक्रम प्रमुख व सस्ते (बप्पा ) वारकरी शिक्षण संस्थेचे सचिव श्री महादेव जालिंदर सस्ते गुरुजी यांनी केले आहे .
चौकट
संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी 10 विद्यार्थी वर्गास
मृदंग वादन व वारकरी शिक्षण दिले जाते .यामध्ये शालेय व वारकरी सांप्रदाय शिक्षण घेऊ इच्छूणाऱ्या व शाळा सोडलेल्या या योजनेत पात्र विद्यार्थांना प्रवेश दिला जातो . त्यांना पारंपारिक संस्कार , सामाजिक हित व स्वावलंबनाचे ही शिक्षण या प्रवेशार्थी विद्यार्थी वर्गास दिले जाते . ह्या विद्यार्थी वर्गास निवासी गुरुकुल पद्धतीने प्रवेश देऊन त्यांचे निवास' ,भोजन , कला शिक्षण देण्याचे व्यवस्थापन व शैक्षणीक हित पाहिले जाते .प्रतिवर्षा प्रमाणे रीक्त जागेवर प्रवेश प्रक्रिया सुरू आसुन इच्छुकांनी 30 जुन पर्यंन्त किवा 9420201195 यावर संपर्क साधावा असे महादेव सस्ते गुरुजी यांनी केले आहे .