भोगजी ता.कळंब गावचे चार सुपुत्रांनी नीट परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल भोगजी येथे गुणवंताचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात निखिल नितीन खराटे 626 व राहुल आश्रूबा खराटे 617 , अवधूत सुनील हांगे 607,हुसेन बशीर शेख 508 यांनी नीट 2024 परीक्षेत आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन उज्वल अस यश संपादन केले आहे,तसेच त्यांनी भोगजीच्या गुणवत्तेच्या वैभवशाली परंपरेत भर घातली आहे, या पूर्वी देखील गोरख तुकाराम मुंढे याने असंख्य संकटावर मात करून हितचिंतकांच्या मदतीने वैद्यक क्षेत्रात आपली सेवा सुरू केली आहे. या गुणवंतांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देण्यासाठी राजेंद्र बिक्कड सर मुख्याध्यापक जी.प.शाळा पाथर्डी, गौतम जाधवर सर मुख्याध्यापक सर्वोदय विद्यालय भोगजी , बालाजी चौधरी सर मुख्याध्यापक जी.प.शाळा भोगजी,डोईफोडे सर, विठ्ठल माने सर ,संजय जाधवर सर,महादेव खराटे सर, ग्रामस्थ पालक यांच्या उपस्थितीत गुणवंतांना शाल, पुष्पगुच्छ व महादेव हरिकिसन खराटे यांच्या तर्फे प्रत्येकी पाच हजारांचे बक्षीस देवून सन्मानित करण्यात आले.वैद्यक क्षेत्रात आपले नाव कमावून या भावी डॉक्टरांनी गरजू लोकांची सेवा करावी अशा भावना उपस्थितांनी व्यक्त करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

