उष्माघाताने होणारे दुष्परीणाम टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना - kalayog

१७ एप्रिल, २०२४

उष्माघाताने होणारे दुष्परीणाम टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना



 

धाराशिव दि.16,(जिमाका) नुकतीच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. या बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काय करावे, व काय करु नये या संदर्भात नागरिकांना पुढील सूचना देणे आवश्यक आहे.

 

हे करा

 पुरेसे पाणी प्या.प्रवासात पाणी सोबत ठेवा.हलक्या वजनाचे,फिकट रंगाचे, सैलसर कपडे वापरा.उन्हात गॉगल छत्री पादत्राणे वापरा.उन्हात जाताना टोपी/हॅटखाली ओलसर कपडा ठेवा. पाळीव प्राण्यांना सावलीत,थंड ठिकाणी ठेवा.ओलसर पडदे,पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा.

 

हे करु नका

          शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळा.कष्टाची कामे उन्हात करु नका. पार्क केलेल्या वाहनात लहान मुले व पाळीव प्राणी ठेवू नका.गडद रंगाचे,तंग कपडे वापरु नका.उन्हाच्या काळात स्वंयपाक करणे टाळा. स्वंयपाकघर हवेशीर ठेवा.मद्य,चहा, कॉफी,सॉफ्ट ड्रिंक्स घेणे टाळा.खूप प्रथिन युक्त अन्न आणि शिळे अन्न खाऊ नका.

 

विविध विभागाने करावयाची कार्यवाही-

 

सर्व तहसिलदार, देवस्थान समिती सदस्य,ग्रामपंचायत,जिल्हा परिषद, एस.टी.महामंडळाचे विभाग नियंत्रक, जिल्हा शल्यचिकीत्सक.जिल्हा आरोग्य अधिकारी.श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर या विभागांनी करावयाची कार्यवाही पुढीलप्रमाणे आहे.

 

उष्माघातामुळे होणारे दुष्परीणाम टाळण्यासाठी मोठया प्रमाणावर होर्डीग लावावेत.शासकीय रुग्णालय, तालुका गावपातळीवरी सर्व आरोग्य केंद्रात वेगळे स्पेशल वॉर्ड तयार करावे.एस.टी.महामंडळांनी बस स्थानकामघ्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची तसेच बसस्थानकामध्ये निवाऱ्याची सोय करावी.जेणेकरुन गरोदर महिला व  मुले वृध्द तसेच अपंग व्यक्ती यांना सोईचे होईल.फळ  विक्रेते किंवा इतर साहित्य विक्रेत्यांनी त्यांच्या दूकानासमोर सावली करावी. जेणेकरुन ग्राहक जास्त वेळ उन्हांत थांबणार नाही.सर्व तहसीलदार व गट विकास अधिकारी यांनी तालुका स्तरावर  यात्रा-जत्रा कालावधीमध्ये ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय,निवारा व्यवस्था,प्रथमोचार केंद्रांची सोय करणे आवश्यक आहे. तसेच मंदिर परिसरामध्ये ज्या ठिकाणी उन्हाचा तडाखा भाविकांना जास्त प्रमाणात जाणवतो अशा ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करणे.सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय असावी.

 

 शासनाच्या परीपत्राकानुसार संबंधित विभागानी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.

                 

 जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आरोग्य सेवेशी संबंधित अधिकारी यांच्याकडून दर सोमवारी उष्माघात या संदर्भात काही मृत्यू झाले असल्यास तसेच वॉर्डमध्ये उपचारासाठी दाखल झालेले रुग्ण व उपचारानंतर बरे होऊन घरी गेलेले रुग्ण याची संपूर्ण माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षास द्यावी.तसेच जे उष्माघात उपचार कक्ष स्थापन केले आहेत याची वेळोवेळी तपासणी करुन ते सुस्थितीत कार्यरत आहेत याची खात्री करावी.

                

पोलिस अधीक्षक यांनी यात्रेची ठिकाणे,आठवडी बाजार,मोर्चे, निदर्शने,धार्मिक स्थळे, वाहतूक, वाहनतळ इत्यादी व गर्दीच्या ठिकाणी आवश्यक ते नियोजन करण्‍याबाबत आपल्या स्तरावरुन सर्व अधिकारी यांना सूचना देण्यात याव्यात.      

                 

जिल्हा प्रशासन अधिकारी नगर परिषद प्रशासन व सर्व नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी बगीचे,उद्याने, झोपडपट्टी,रस्त्यावरील विक्रेते इत्यादी बाबतीत नियोजन करणे,शहरातील नाली व गटारी सुस्थितीत ठेवणे, पिण्याचे पाणी स्वच्छ निरजंतूकीकरण करुन पुरवठा करणे.नगर परिषद अंतर्गत फिरत्या घंटा गाड्यांच्या माध्यमातून पाण्याचा वापर जपून करा तसेच  उन्हाळ्यात काय करावे व  काय करु नये याबाबत जनजागृती करण्यासाठी माहिती प्रसारण करण्यात यावी.

 

उपसंचालक (Deputy Director Factory/Industry) यांनी भट्टीशी संबंधित कारखाने/व्यवसाय येथे काम करणाऱ्या कामगारांच्या कामाचे नियोजन व नियमन करणे.

                  

 नियंत्रक (Controller) बसस्थानक यांनी पंखे,पिण्याचे पाणी,प्रथमोपचार इत्यादी प्राथमिक सुविधा उपलब्ध राहतील याची खात्री करणे.बस चालक-वाहक यांचे वयोमानानुसार 50 वर्षा पेक्षा जास्त वय असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या स्थितीनुसार कामाच्या तासाचे नियोजन करणे.

                    

          नियंत्रक रेल्वे स्थानक यांनी पंखे,पिण्याचे पाणी,प्रथमोपचार इत्यादी प्राथमिक सुविधा उपलब्ध राहतील याची खात्री करणे.

                 

शिक्षणाधिकारी माध्यमिक / प्राथमिक यांनी शाळेचे वेळापत्रक (सकाळ सत्र), पिण्याचे पाणी,पंखे प्रथमोपचार इत्यादी प्राथमिक सुविधा उपलब्ध राहतील याची खात्री करणे.

                    

रस्ते परिवहन अधिकारी यांनी शालेय वाहतूक वाहनांबाबत नियोजन करणे व शहरातील गर्दीच्या ठिकाणी सावलीत सदर वाहने पार्किंग करणेबाबत सूचना देण्यात यावी.

                     

उपजिल्हाधिकारी (MREGS) यांनी मनरेगा/ नरेगा अंतर्गत मजुरांना दुपार सत्रात विश्रांती देऊन त्यांच्या सोयीनुसार सकाळ अथवा संध्याकाळ सत्रात कामे वाटून देणे.

               

          उपसंचालक पशु संवर्धन विभाग यांनी जिल्हा माहिती अधिकाऱ्यांमार्फत नागरिकांना देशी व विदेशी जातीच्या पाळीव प्राण्यांविषयी करावयाच्या उपाययोजनाविषयी घ्यावयाची काळजी याबाबत माहितीपत्रक प्रसिद्ध करणे.पुरेश्या प्रमाणावर औषधसाठा व सुविधा उपलब्ध करणे.

              

          वन अधिकारी यांनी सर्व क्षेत्रिय अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करणे व वन्य प्राण्यासाठी पान तळी निर्माण करणे,देखभाल व दुरुस्ती करणे वनवा प्रतिबंधक उपाय योजना करणे.

                 

जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था यांनी सर्व बाजार समित्या, सहकारी कारखाने, सहकारी संख्या, पणन उद्योग या ठिकाणी सुयोग्य पाण्याची व प्राथमिक सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करणे.

                 

कृषी व सिंचन या विभागाने उष्णतेच्या परिणामामुळे पिकांची हानी टाळण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे, शेती व शेती पुरक उद्योगांना पुरेसे पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शेततळी,बंधारे, तलाव यांची निर्मिती व देखभाल करणे.

                  

वरील प्रमाणे सर्व विभाग प्रमुख यांनी तातडीने कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास तात्काळ सादर करावा.असे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे  तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी कळविले आहे.