छत्रपती शिवाजी महाविद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा - kalayog

१५ मार्च, २०२४

छत्रपती शिवाजी महाविद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा


छत्रपती शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, जिजाऊ युवतीमंच व आयक्युएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
 या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. सुषमा कांबळे  (शि.म.ज्ञा.मो.म.) व प्रा. शितल भवर (सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालय) यांची उपस्थिती होती यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छ. शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व संस्थापक सचिव कै.नरसिंग (अण्णा) जाधव यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. सुषमा कांबळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की मुलींनी या काळात स्वतः स्वालंबी बनणे गरजेचे आहे प्रत्येक मुलीला स्व  संरक्षण करता आले पाहिजे याकरता कराटे सारखे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे शिवाय आपले व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी शिक्षणाबरोबर व्यावसायिक प्रशिक्षणही घेतले पाहिजे असे मत व्यक्त केले

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य शशिकांत जाधवर रा.से यो. कार्यक्रमाधिकारी प्रा. ज्योतिराम जाधव ,प्रा.डॉ. आनंत नरवडे, प्रा.डॉ.अनिल जगताप व प्रा. विनायक मिटकरी यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य शशिकांत जाधवर यांनी केला तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुनिता चोंदे सूत्रसंचालन प्रा.मनिषा कळसकर व आभार प्रा.डॉ. विद्युलता पवार यांनी मांनले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.