अयोध्या राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा - kalayog

२२ जानेवारी, २०२४

अयोध्या राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा

अयोध्येत 6 दिवसांच्या धार्मिक विधीनंतर सोमवार, 22 जानेवारी रोजी रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. आरएसएस प्रमुख मोहन भागवत, पीएम मोदी यांच्यासह सहा पाहुणे पूजेला उपस्थित होते. गेल्या आठवड्यातच मंदिरात 51 इंची नवीन मूर्ती ठेवण्यात आली होती.हातात चांदीचे छत्र आणि लाल अंगवस्त्र घेऊन मोदी दुपारी 12.05 वाजता राम मंदिरात पोहोचले. यानंतर पंतप्रधानांनी कमळाचे फुल हातात घेऊन प्रार्थना केली. प्रभू रामाचे बालस्वरूप पाहिले. शेवटी पंतप्रधानांनी रामलल्लाला साष्टांग नमस्कार घातला.प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर निर्मोही आखाड्याचे स्वामी गोविंदगिरी यांच्या हस्ते पाणी पिऊन पंतप्रधानांनी 11 दिवसांचे उपवास सोडले.