कळंब : कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी यांचे संयुक्त विद्यामाने आयोजित अंतर महाविद्यालय अॅथलेटीक्स मैदानी स्पर्धेचे आयोजन वाशी जि.धाराशिव येथे करण्यात आले होते.
आयोजित केलेल्या विविध क्रिडा स्पर्धेमध्ये छ.शिवाजी महाविद्यालयाने सहभाग नोंदवून विविध क्रिडा प्रकारामध्ये यश संपादन केले.यामध्ये महाविद्यालयाची विद्यार्थिनी अश्विनी सातपुते 200 मीटर मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.श्रुती भांडे हिने गोळा फेक मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला तसेच श्रेया भांडे हिने 400 मीटर मध्ये तृतीय क्रमांक पटकावला.या सर्व विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेमध्ये यश संपादन केल्याबद्दल विजयी उमेदवाराचे पदक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.या यशाबद्दल संस्थेच्या वतीने संस्थेचे सचिव मा.शिवाजी (आप्पा) कापसे अध्यक्ष.श्री.श्याम (नाना) खबाले, उपाध्यक्ष प्रा.अविनाश मोरे,सहसचिव प्रा.संजय घुले व कोषाध्यक्ष श्री.बाळकृष्ण गुरसाळे प्राचार्य.शशिकांत जाधवर व शिवकुमार खबाले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले. शिवकुमार खबाले यानी यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.