“कम्युनिटी पोलीसिंग अंतर्गत दिवाळी सणा निमित्त एक हात मदतीचा गरजवंतासाठी उपक्रमाचे आयोजन.” - kalayog

१० नोव्हेंबर, २०२३

“कम्युनिटी पोलीसिंग अंतर्गत दिवाळी सणा निमित्त एक हात मदतीचा गरजवंतासाठी उपक्रमाचे आयोजन.”

 कम्युनिटी पोलीसिंग अंतर्गत दिवाळी निमित्त एक हात मदतीचा गरजवंतासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन

करण्यात आले आहे. या उपक्रमात गोरगरीब कुटुंबाला फराळाचे साहित्य, मुलांसाठी कपडे, शैक्षणिक साहित्य तसेच जिवन आवश्यक वस्तू भेट स्वरुपात देण्यात येणार आहे. त्यासाठी समाजातील दानशुर व्यक्तींनी भेटवस्तु देवून या उपक्रमाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.

    दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे या सणाचा आनंद अनेक गोरगरिब कुटुंबातील लोकांना मिळत नाही म्हणून त्यांना  या सणाच्या आनंदात सहभागी करुन घेण्यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने एक हात मदतीचा गरजवंतासाठी हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. या निमीत्ताने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी विविध पक्ष सामाजिक संघटनाचे पदाधिकारी, प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

   या उपक्रमात दानशुर व्यक्तीने दिवाळी फराळाचे साहित्य, कपडे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य, अथवा आपापल्या इच्छेनुसार गरजवंताला लागणारे साहित्य उपलब्ध करुन दयावे असे आवाहन यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केले. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून उपस्थित मान्यवरांनी मदत उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या पुढाकाराने गोरगरिबांची दिवाळी गोड होणार आहे.

         या उपक्रमा अंतर्गत मदत करण्यास इच्छुक असलेल्या दानशुर व्यक्तींनी  पोलीस कल्याण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सिध्देश्वर गोरे (9922000580), पोलीस नाईक गणेश शिंदे मोबाईल नं(9922217189) यांच्याशी संपर्क साधावा. 

           

                                                                                                जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस