नूतन निवासी उपजिल्हाधिकारी महादेव किरवलेकर यांनी पदभार स्वीकारला - kalayog

१५ सप्टेंबर, २०२३

नूतन निवासी उपजिल्हाधिकारी महादेव किरवलेकर यांनी पदभार स्वीकारला


 जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथील रिक्त असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी या पदाचा कार्यभार आज महादेव किरवले यांनी  रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्र कुमार कांबळे यांच्याकडून स्वीकारला. याप्रसंगी श्री. किरवले यांचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी  स्वागत केले.

          श्री. किरवले यांनी यापुर्वी नांदेड, परभणी आणि औरंगाबाद याठिकाणी तहसीलदार व उपजिल्हाधिकारी अशा विविध पदांवर काम पाहिले आहे.