धाराशिव /प्रतिनिधी:-
व्हॉइस ऑफ मीडिया धाराशिव जिल्हा साप्ताहिक विंग च्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करून त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान मंगळवार दिनांक 25 जुलै रोजी धाराशिव येथील जत्रा फंक्शन हॉल कौटुंबिक मेळाव्यात करण्यात आला.
या कार्यक्रमालाच्या अध्यक्षस्थानी धाराशिव चे तहसीलदार डॉ.सदानंद बिडवे तर प्रमुख पाहुणे व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे ,प्रमुख उपस्थिती धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील, येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ.संदीप तांबारे, कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रा.तुषार वाघमारे , व्हॉइस ऑफ मीडिया शिक्षण मदत विभागाचे प्रदेशाध्यक्ष चेतन कात्रे, मराठवडा उपाध्यक्ष अमर चोंदे धाराशिव जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, साप्ताहिक विंग जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते यांच्या हस्ते नियुक्तीपत्र सन्मानचिन्ह ,शाल,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
राजेश बिरादार जिल्हा कार्याध्यक्ष, सुनील देशमुख , जफर शेख, महेबूब पठाण जिल्हा उपाध्यक्ष, श्रीकृष्ण लोमटे जिल्हा सरचिटणीस,ज्योतिराम निमसे, महबूब इस्माईल फकीर जिल्हा संघटक, राजकुमार गंगावणे जिल्हा कार्यवाहक, योगराज पांचाळ जिल्हा प्रसिद्ध प्रमुख,श्रीनिवास साळुंखे प्रवक्ता ,सुभाष घोडके, रतिलाल शहा मार्गदर्शक, शरद आडसुळ,नरसिंह खिचडे तुळशीराम चंदनशिवे, प्रल्हाद आडागळे, नूरजहाँ शेख संदीप कोकाटे, राम जळकोटे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली तर. धाराशिव तालुकाध्यक्षपदी ज्योतीराम निमसे, कळंब तालुकाध्यक्षपदी अविनाश घोडके भूम तालुकाध्यक्षपदी प्रल्हाद आडागळे, उमरगा तालुकाध्यक्ष महेबूब पठाण यांची नियुक्तीपत्र शाल पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी त्यांचे कुटुंबीय त्यांच्यासोबत हजर होते कार्यक्रमाला जिल्हाभरातून संपादक ,ज्येष्ठ पत्रकार, पत्रकार यांची यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती, कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते यांनी, सूत्रसंचालन शरद आडसुळ तर आभार ज्योतीराम निमसे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडियाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.