केज उपजिल्हा रुग्णालयात कोब्रा सर्पदंशावर विलाज, भोगजीच्या शेतकऱ्याचे वाचले प्राण - kalayog

३० जून, २०२३

केज उपजिल्हा रुग्णालयात कोब्रा सर्पदंशावर विलाज, भोगजीच्या शेतकऱ्याचे वाचले प्राण

 

कळंब : भोगजी ता. कळंब येथील शेतकरी पंढरीनाथ कोडीबां आडसुळ वय ४५ वर्ष हे सकाळी 6.30 च्या जवळपास आपल्या शेतातील जनावरांना भुस्कट टाकत असतानां आचानक त्यांच्या हाताला कोब्रा जातीच्या सापाने दंश केला त्यांनी न घाबरता शेतातच रहात असलेल्या दौलत आडसुळ या मोठ्या भावाला सांगितले त्यांनी वेळ न घालवता दवाखान्यात घेवून जाण्यासाठी चुलत भाऊ बालाजी आडसुळ यांच्या सोबत पाठवले कळंब च्या डॉ. डिकले यांनी प्रथम उपचार करून अंबाजोगाई येथे जाण्याचे सूचित केले . बालाजी आडसुळ यांनी माळेगांव ते लोखंडी रस्ता खराब असल्यामुळे केज मार्गे ते अंबाजोगाई कडे निघाले पण केज मधुन जात असताना लावलेले सलाईन संपले व त्यांनी थेट सकाळी ८ वाजता केज उपजिल्हा रुग्णालय गाठले त्या वेळेस तेथे हजर असलेले बाहुला या शेजारच्या गावचे सुपुत्र डॉक्टर सुरज कोठावळे व अयेशा शेख या
डॉक्टरांनी वेळ न घालविता रुग्णाच्या नातेवाईकांनी सोबत आणलेल्या सापाची प्रजात ओळखून अनुभवाच्या बळावर उपचाराला सुरुवात केली. प्रथम रुग्णाला कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यात आला दोन तास त्याच्यावर शर्थीचे उपचार केले व पंढरीनाथ आडसुळ यांना जीवदान देण्यात यश आले व डॉक्टरांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सद्या रुग्णाला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. यावेळी डॉ संजय राऊत, डॉ सुरज कोठावळे, डॉ अयेशा शेख, सिस्टर गजभार कावेरी, ठोंबरे शोभा यांनी अथक परिश्रम घेतले त्या बदल आडसुळ परिवाराने सर्व डॉक्टरांचे आभार मानले व आज केज उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आमच्या साठी देवदूतच ठरले अशी भावाना बालाजी आडसूळ यांनी व्यक्त केली.
 केज उपजिल्हा रुग्णालयात लोकांनी निसंकोच उपचारासाठी यावे कुठल्याही जातीचा साप, नाग, धामण परड, कोब्रा विवीध प्रकारचे विषारी सापावर पुर्ण उपचार सुविधा उपलब्ध असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.