हा तर जनतेच्या विश्वासाचा विजय - जिल्हाप्रमुख साळुंके
धाराशिव-
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सत्तासंघर्षात गुरुवारी (दि.11) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सेना-भाजप सरकारच्या बाजूने निकाल दिला आहे. या निकालाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची जोरदार आतषबाजी करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके म्हणाले की, शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाले आहे. धाराशिव जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत जनतेने पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत, आमदार ज्ञानराज चौगुले, भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठे यश मिळवले आहे. हा कौल म्हणजे जनता शिंदे-फडणवीस सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे सिद्ध झाले आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. तसेच पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, पप्पू मुंडे, भीमा जाधव, अमर माळी, कुणाल धोत्रीकर, कमलाकर दाणे, रजनीकांत माळाळे, प्राणिल रणखाम्ब, प्रशांत पाटील, पिंटू पवार, अजिंक्य आगलावे, गणेश जाधव, दिनेश तुपे, बबलू वंडरे, सुरज राऊत, सचिन मडके, लखन झिरमिरे, अक्षय माळी, निखिल घोडके, अतिश सोनटक्के, भूषण मस्के, नागेश शेटे, गणेश मोरे, गोपालकृष्ण पाटील, राजेश माळाळे, बाळाजी पवार, विजय बारकुल, विशाल हिंगमीरे, स्वप्नील शिंदे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.