साप्ताहिक कलायोग च्या सर्व वाचक बांधवांना दिपवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. साप्ताहिक कलायोग चा दहावा वर्धापन दिन साजरा करत असताना आम्हाला सार्थ अभिमान वाटतो की आपल्या सहकार्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो .आज पर्यंत आम्ही समाजातील कलात्मक संस्कारात्मक आणि योग या विषयावरचं उत्तुंग क्षेत्रामध्ये जे काही यश मिळवले आहे अशा व्यक्तिमत्त्वाचं कार्य सर्वांसमोर मांडण्याचे कार्य साप्ताहिकाने केले आहे. सप्ताहात घडणा-्या ठळक घडामोडी चा आढावा घेऊन वास्तव जनतेसमोर मांडण्याचा निर्भीडपणे काम प्रामाणिकपणे करत आहोत. एवढा सगळा माहिती तंत्रज्ञानाच्या युगात समाज माध्यमांचा भडिमार आसून देखील आपली माहितीच्या विश्वासार्हतेमुळे ओळख निर्माण झाली आहे.त्यामुळे हे साप्ताहिक कालायोग हे लोकप्रियतेचा उच्चांक गाठणारे एक साप्ताहिक बनलेले आहे.आज पासून वेब आपल्यासाठी वेब आवृत्तीची सुसुवात करत आहोत यामुळे जगभारात कुठेही आपण आमच्याशी जोडून राहू शकाल. समाजामध्ये असंख्य प्रश्न आहेत परंतु त्या प्रश्नावर कटाक्ष टाकून त्याचा पाठपुरावा करून त्याकडे दुर्लक्ष करणा-्यांना लक्ष द्यायला लावून तिथल्या समस्या दूर करण्यासाठी हातभार लावण्याचे कार्य हे साप्ताहिक करत आहे. या समाजात असंख्य कलावंत आहेत.त्यांच्याकडे असलेल्या कलेची ओळख सर्वसामान्य न्हावी त्यांची कला जनसामान्यापर्यंत पोहोचावी हेच उद्दिष्ट ठेवून कलायोग हे वृत्तपत्र आपली वाटचाल करत आहे.सामाजिक बांधिलकी जोपासत समाजातील वंचित घटकांना एकत्र आणून त्यांच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कलात्मक संस्कारातून शिक्षण मिळावं यासाठी विविध शिबिरांचं आयोजन केलं जातं त्यामधून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कला,संस्कार, योग ,आरोग्य या प्रकारचे मार्गदर्शन करण्यात येते.सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमी अग्रेसर असणारे सा.कालायोग वृत्तपत्र नेहमी आपली धुरा सांभाळत राहील. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा दीपोत्सवाचा सण आपण सर्वजण मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत साप्ताहिक कालायोग आपणा सर्वांना एक नम्र निवेदन करत आहे की आपण हा सण पर्यावरण पूरक व एकमेकांची काळजी घेवून साजरा करावा. यामुळे आपल्या आजूबाजूला परिसरात अवतीभोवती जर कोणी अनाथ असेल तर त्याला सोबत घेऊन आनंद द्यावा. लोकप्रियतेच्या व विश्वासहार्य तेच्या कसोटीवर उतरलेले हे वृत्तपत्र नेहमी आपल्या सेवेसाठी तत्पर राहील पुनश्च दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
