कळंब तालुक्यातील इटकूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद प्रशालेच्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या वर्गणीतून बांधन्यात आलेल्या नूतन मुख्य प्रवेशद्वार व फलकाचे लोकार्पण दि. ०७/०७/२०२२ रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत चोखामेळा पुरस्कार प्राप्त ह.भ. प महादेव महाराज आडसुळ तसेच प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षण अधिकारी मधुकर तोडकर, विस्तार अधिकारी फुलारी, केंद्रप्रमुख गामोड, तसेच डि.के कुलकर्णी (साने गुरुजी कथामाला जि.अध्यक्ष), पत्रकार अनंत अडसूळ, यांची प्रमुख उपस्थिती होती.
इटकूर येथील जिल्हा परिषदेच्या इ.सन २००५ वर्षातील एकूण पन्नास माजी विद्यार्थ्यांनी एक लाख रु जमा करून शाळेच्या नवीन (आरसीसी) बांधकाम प्रवेशद्वार नाम फलकाची उभारणी केली आहे.
तसेच शाळेच्या प्रवेशद्वाराचे लोखंडी गेट लोकवर्गणीतून बसवण्यात आले आहे.
या कार्यक्रमात इ. सन २००५ मधील माजी विद्यार्थ्यांच्या वतीने माजी शिक्षक
श्री बाळकृष्ण तांबारे सर,
श्री राजाभाऊ गिरी सर,
श्री एस.आर पाटील सर
श्री उबाळे सर
श्री संतोष भोजने सर
श्री गोरे सर
श्री कवडे सर
श्री सोने सर
श्री ताटे सर
श्री चव्हाण सर
सौ पाळवदे मॅडम
श्री नामदेव पखाले सर
श्री एस.आर वाघमारे सर
श्री शिलवंत सर
श्री बोबडे सर
श्री जगताप सर
श्री व्ही बी वाघमारे सर
श्री एस बी सावंत सर
श्री अजय पाटील सर
श्री तानाजी देटे.
यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन येथोचीत सत्कार करण्यात आला.
तसेच प्रशालेच्या वतीने दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रशालेतील शिक्षक श्री.नामदेव पखाले सर यांची दुसऱ्या शाळेवर बदली झाली यामुळे त्यांना निरोप देण्यात आला.तेरा वर्ष या प्रशालेत सेवा देवून निरोप घेताना आठणीना सरांनी उजाळा दिला.
या कार्यक्रमास हनुमंत कसपटे, लक्ष्मण आडसुळ, हनुमंत कसपटे, महादेव पावले, प्रदीप फरताडे, तुकाराम शिंदे, एल.डी शिंदे, तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरिदास पावले, सचिन गंभीरे, उपाध्यक्ष प्रभाकर आडसुळ, श्रीशैल्य खराडे तसेच शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
कार्यक्रम सूत्रसंचालन - तुकाराम गरूडे.
आभार प्रदर्शन - अनिल क्षीरसागर यांनी केले.